जिल्हास्तरीय प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. बालाजी बरुरे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.एस.एन तांबारे यांची उपस्थिती

 जिल्हास्तरीय प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. बालाजी बरुरे आणि

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.एस.एन तांबारे यांची उपस्थिती  

लातूर, दि. 6 (जिमाका) : जिल्हास्तरीय प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन ३ सप्टेंबर २०२४ रोजी वडवळ ना. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आले. यावेळी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.बालाजी बरुरे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.ताबांरे एस.एन. यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब पाटील होते.

मंचावर सरपंच मुरलीधर सोनकांबळे, उपसरपंच बालाजी गदगे, प्राथमिक आरोग्य केंद्रोच वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.एस.नागरगोजे व वैद्यकीय अधिकारी डॉ.सिया पटेल आदी उपस्थित होते. तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत करण्यात आलेल्या १८ वर्षावरील  व्यक्तींच्यासर्वेक्षणामध्ये एकूण १ लाख ९ हजार ९४१ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

प्रौढांसाठी बीसीजी लसीकरणाचे निकष

ज्याचे वय ६० वर्षे पूर्ण झाले आहे, त्या सर्वांना, ज्यांना गेल्या पाच वर्षात क्षयरोग झाला होता, गेल्या तीन वर्षात क्षयरुग्णांच्या सहवासात राहिलेल्यांना, जे धुम्रपान करतात किंवा पूर्वी धुम्रपान करत होते, ज्यांना मधुमेह आहे. ज्या व्यक्तींचा बॉडी मास्क इंडेक्स (बीएमआय) हा १८ पेक्षा कमी आहे. (कुपोषित प्रौढ) अशा व्यक्तींना बीसीजी लसीकरण केले जाते. जिल्ह्यात ३लाख १९ हजार २१८ पात्र लाभार्थी आहेत. त्यासाठी एकूण ४ हजार २८२ पुर्वनियाजित लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आलेली आहेत.

भविष्यात क्षयरोगाचा संसर्ग रोखण्यासाठी क्षयरोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रोढ बीसीजी लसीकरण मोहिम व फुफ्फुसाचा क्षयरोग असलेल्या क्षयरुग्णांच्या सानिध्यातील सहवासितांना क्षयरोग प्रतिबंधक उपचार सुरु केल्याचे डॉ. तांबारे यांनी सांगितले. तसेच डॉ.बालाजी बरुरे यांनी उपस्थित सर्व पात्र लाभार्थी यांनी पौढ बीसीजी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले .

प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉ. नागरगोजे यांनी, तर सूत्रसंचालन आशा सुपरवायझर रेणुका शिंदाळकर यांनी केले. आभार समुदाय अधिकारी डॉ. महादेव सोनवणे यांनी मानले . 

**** 





Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा