बालगृहात दाखल मुलीच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
लातूर, दि. १९ : बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार सोनाली अंबादास कडगंजे (जन्म दिनांक- १० जानेवारी २०१२, वय १२ वर्षे ६ महिने) या बालिकेला १ एप्रिल २०२४ रोजी लातूर एमआयडीसी येथील मुलींचे निरीक्षणगृह तथा बाल गृहात दाखल करण्यात आले आहे. तिची उंची १४८ सेमी असून तिचा चेहरा लंब गोलाकार आहे. रंग सावळा आहे व शरीराने सडपातळ आहे. या बालिकेचे माता-पिता,पालक व इतर नातेवाईक यांनी धम्मानंद कांबळे (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी), लातूर मो.नं.: ९८२२१३७३२७ किंवा सागर मलावडे (अधीक्षक, मुलीचे निरीक्षणगृह तथा बालगृह एमआयडीसी,लातूर) मो.नं.९७६५०६४९१७ यांच्याशी ३० दिवसांच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment