मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लातूर विमानतळावर स्वागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लातूर विमानतळावर स्वागत
लातूर, दि. 14 (जिमाका): धाराशिव जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, लातूर शहर महानगरपालिका उपायुक्त पंजाबराव खानसोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थिती होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे लातूर विमानतळ येथेून हेलिकॉप्टरने धाराशिव जिल्ह्यातील परांडाकडे प्रयाण केले. परांडा येथे होत असलेल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम आणि धाराशिव येथील शिवसेना पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी ४.१५ वाजता मुख्यमंत्री यांचे लातूर विमानतळ येथे आगमन होईल व विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
***
Comments
Post a Comment