महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात ६९ जणांची शिकाऊ उमेदवार म्हणून होणार निवड
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या
लातूर विभागात ६९ जणांची शिकाऊ उमेदवार म्हणून होणार निवड
लातूर, दि.18 (जिमाका): लातूर विभागाचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात सन २०२४ - २०२५ भाग ०२ सत्रासाठी वेगवेगळ्या व्यवसायाकरिता शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणून ६९ पदे ऑनलाईन पध्दतीने पदे निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये मोटार मेकेनिक (यांत्रिक मोटारगाडी एमएमही)-४१, मोटारगाडी साठाजोडारी (एमव्हीबीबी) (शिट मेटल) १५, अॅटो इलेक्ट्रीकल ईलेक्ट्रीशियन (विजतंत्री) - ०७, सांधाता (वेल्डर) (गॅस अॅन्ड ईलेक्ट्रीकल)-०१, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अॅड एअर कंडिशनर (प्रशितन व वातानुकुलिकरण टेक्नीशियन)-०२, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्टॉनिक्स ०१, अभियांत्रिकी पदवीधर-०१, तसेच अभियांत्रिकी पदविका-०१ या पदांचा समावेश आहे.
दहावी पास, आय.टी.आय किंवा विहीत व्यवसायात व्होकेशनल आभ्यासक्रम एमएसबीएसव्हीईटी पूर्ण केलेल्या तसेच (उमेदवांरानी सर्वप्रथम एनएपीएस वेब पोर्टलवरील www.apprenticeshipindia.gov.in व अभियांत्रिकी पदवीधर, अभियांत्रिकी पदवीकासाठी एनएटीएस-2.0 (NATS-2.0) पोर्टलवरील www.nats.education.in या वेबसाईटवर १९ सप्टेंबर, २०२४ ते २९ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून MSRTC Division Latur E01172700461 या आस्थापनेसाठी ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांनी विभागीय कार्यालयात उपलब्ध करून दिलेले छापील अर्ज भरावेत. छापील अर्ज रा.प. विभागीय कार्यालय, जुना रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, लातूर (आस्थापना शाखा) येथे ३० सप्टेंबर, २०२४ ते ७ ऑक्टोबर, २०२४ रोजी (शनिवार व रविवार वगळून) वेळ १० ते दुपारी ३ या वेळेत मिळतील व लगेच स्विकारले जातील.
अर्जासोबत जीएसटी 18 टक्के खुल्या प्रवर्गाकरीता रु ५९०/- व मागासवर्गीयांसाठी २९५/- चा धनादेश किंवा आय.पी.ओ. (इंडियन पोस्टल ऑर्डर) MSRTC Fund Account Latur या नावाने अर्ज घेतेवेळी सोबत असणे आवश्यक आहे.
१९ सप्टेंबर, २०२४ ते २९ सप्टेंबर, २०२४ या कालावधी नंतर जे उमेदवार ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील, अशा उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. ते अर्ज रद्द समजले जातील व त्यांना या कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज मिळणार नाही. व ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवाराचे ७ ऑक्टोबर, २०२४ रोजी दुपारी 3 नंतर या कार्यालयात सादर केलेले विहीत नमुन्यातील अर्ज स्विकारले जाणार नाहीत. त्यांचा शिकाऊ उमेदवार भस्तीसाठी विचार केला जाणार नाही.
****
Comments
Post a Comment