संजय गांधी योजना,श्रावणबाळ योजनेच्या लातूर शहरातील लाभार्थ्यांनी डीबीटीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
संजय गांधी योजना,श्रावणबाळ योजनेच्या लातूर शहरातील लाभार्थ्यांनी
डीबीटीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
लातूर, दि. 10 (जिमाका) : विशेष सहाय्य योजनेतील राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना शासनामार्फत देण्यात येत असलेला लाभ तात्काळ मिळावा, यासाठी डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे अर्थसहाय्य वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याकरिता आवश्यक कागदपत्रे लातूर तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष सहाय्य योजनेतील राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची माहिती डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीवर भरण्यासाठी या योजनेतील लातूर शहरातील ज्या लाभार्थ्यांनी त्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक, राशनकार्ड व मोबाईल नंबर याबाबतची माहिती संबंधित बँकेत अथवा लातूर तहसील कार्यालय येथे अद्याप जमा केली नाही, अशा राज्य पुरस्कृत संगायो व श्रावणबाळ योजनेतील लातूर शहरातील लाभार्थी यांनी त्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक, राशनकार्ड यांच्या छायांकित प्रत व मोबाईल नंबर तीन दिवसात लातूर तहसील कार्यालय लातूर (संगायो लातूर शहर शाखा) येथे जमा करावेत, असे आवाहन तहसीलदार यांच्यावतीने करण्यात येत आहेत.
***
Comments
Post a Comment