जिल्हास्तरावर उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योगांना मिळणार पुरस्कार ! § पुरस्काराठी 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हास्तरावर उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योगांना मिळणार पुरस्कार !

§  पुरस्काराठी 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन   

लातूर, दि. 10 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयातर्फे जिल्ह्यात असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु उद्योग घटकांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून दरवर्षी जिल्हास्तरावर उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योगांना पुरस्कार दिले जातात.  प्रथम व द्विातीय पुरस्कार अनुक्रमे 15 हजार रुपये , 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते. सन 2024 या वर्षासाठी या योजनेतंर्गत सुक्ष्म व घु उद्योग घटकामार्फत 25 सप्टेंबर, 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.  

अर्जाच्या वेळी, उद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी उद्म नोंदणी असणे आवश्यक आहे. कमीत कमी मागील सलग दोन वर्षापासून उत्पादनात असणे आवश्यक आहे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी (थकबाकीदार असू नये). उद्योग घटकास यापूर्वी कोणताही (जिल्हास्तरीय, आंतरराष्ट्रीय) स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे.

या पात्रता धारण करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील लघु उद्योजकांनी 25 सप्टेंबर, 2024 पूर्वी जिल्हा उद्योग केंद्र लातूर यांच्याकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण खडके यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु