दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी 100 टक्के अनुदानावर मिळणार बियाणे

                                                           दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी

100 टक्के अनुदानावर मिळणार बियाणे

 

लातूर, दि.25 (जिमाका) :   जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम, वैरण व पशुखाद्य कार्यक्रम अंतर्गत (सर्वसाधारण) या योजनेतून सुधारित बाजरा नं. 1 व मॅक्स सायलेज संकरीत मका बियाणे 100 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील दहाही तालुक्यातून या योजनेसाठी अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (वि) , पंचायत समिती किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडून उपलब्ध करुन घ्यावेत.

पूर्णपणे भरलेले विहीत नमुन्यातील अर्ज 25 सप्टेंबर, 2024 ते 3 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत संबंधित पुशवैद्यकीय दवाखान्यात जमा करावेत. लाभार्थ्यांची निवड पात्र अर्जामधून सोडत पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे 4 ऑक्टोबर, 2024 नंतर प्राप्त होणाऱ्या किंवा अपूर्ण अर्जाचा निवडीच्या सोडतीसाठी विचार केला जाणार नाही.

तरी जास्तीत जास्त संख्येने लातूर जिल्ह्यातील सर्व जातीच्या व्यक्तींनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी , जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ. बी. यु. बोधनकर यांनी केले आहे.

**** 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा