जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना नदीकाठच्या गावांमध्ये विशेष खबरदारी  घेण्याच्या सूचन

जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना नदीकाठच्या गावांमध्ये विशेष खबरदारी  घेण्याच्या सूचना लातूर, दि. 2 : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. तसेच नदीकाठच्या गावांमध्ये विशेष खबरदारी घेण्याच्या आणि सर्व अधिकाऱ्यांनी फिल्डवर राहून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्याकडून पालकमंत्री श्री. महाजन यांनी नुकसानीचा आढावा घेतला. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे, या नुकसानीचे पंचनामे त्वरीत सुरू करून नुकसानीची अचूक माहिती संकलित करावी. एकाही शेतकऱ्याचे नुकसान यामधून सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी. यासोबतच घरांची पडझड, जनावरे दगवण्यासारखे प्रकार घडले असल्यास संबंधितांना त्वरीत मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. मनुष्यहानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात. नदीकाठीच्या गावांमधे विशेष खबरदारी घ्यावी, अशा ठिकाणी पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिल्या. लातूर जिल्ह्यात 1 सप्टेंबर रोजी अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने काही ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु