शेतकऱ्यांना अनुदानावर स्लरी फिल्टर,बिज प्रक्रिया ड्रम, सोयाबीन टोकण यंत्र ! रब्बी हरभरा पीकासाठी जीवाणू संपर्क संघाचा पुरवठा

 शेतकऱ्यांना अनुदानावर स्लरी फिल्टर,बिज प्रक्रिया ड्रम, सोयाबीन टोकण यंत्र !

रब्बी हरभरा पीकासाठी जीवाणू संपर्क संघाचा पुरवठा  

लातूर, दि. 10 (जिमाका) :  जिल्हा परिषद सेस फंडातून स्लरी फिल्टर, बिज प्रक्रिया ड्रम, सोयाबीन टोकण यंत्र अनुदानावर डीबीटी तत्वावर देण्यात येणार आहे, तसेच रब्बी, हरभरा पीकासाठी जीवाणू संवर्धक संघ एक हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी 24 सप्टेंबर, 2024 पर्यंत पंचायत समिती स्तरावर  अर्ज करावेत. त्यानुसार 31 जुलै, 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.  अर्जातून काही बाबींचा लक्षांक पूर्ण होत नसल्याने नव्याने अर्ज मागविण्यात येत आहेत. या आवाहनानंतर येणाऱ्या अर्जाची नव्याने सोडत काढली जाईल व त्यांची जेष्ठताही माहे दिनांक 31 जुलै, 2024 पर्यंत आलेल्या अर्जानंतर अनुक्रमांकानुसार लावली जाईल. योजनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प अत्यल्पभुधारक व महिला यांना प्राधान्य राहील.

इच्छूक शेतकऱ्यांनी स्वत:चा सातबारा, आठ अ, आधारकार्ड, बँक पासबुकाच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे असल्याचे जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग लाभार्थींसाठी दिव्यांगत्वाच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रतीसह आपल्या पंचायत समितीकडे अर्ज करावेत.

लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीच्या औजाराची खरेदी करावी लागेल. खरेदी करावयाचे औजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परिक्षण करुन ते बी.आय.एस. अथवा अन्य संस्थानी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार, तांत्रिक निकषानुसार असावे लागेल.

रब्बी हरभरा पिकासाठी जीवाणू संवर्धक संघ, एक हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येईल व याचा पुरवठा पंचायत समिती स्तरावरुन करण्यात येईल.

इच्छूक शेतकऱ्यांनी 20 सप्टेंबर, 2024 पर्यंत आपल्या पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज करावेत, असे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व लातूर कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

*** 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु