पाठ्यपुस्तक मंडळाची विभागीय भांडारे 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान राहणार बंद
पाठ्यपुस्तक
मंडळाची विभागीय भांडारे
27
ते 30 सप्टेंबर दरम्यान राहणार बंद
लातूर, दि.25 (जिमाका) : दिनांक 27 ते 30
सप्टेंबर, 2024 या कालावधीत पुस्तके व कागदाची वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी होणार
असल्याने या कालावधीत मंडळाची गोरेगाव, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक,
कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील विभागीय भांडारामधील व्यवहार (आवक-जावक, विक्री इत्यादी)
बंद राहतील, असे पुणे पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment