लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन अर्थसहाय्य मिळविण्यासाठी कृषि विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

  लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन अर्थसहाय्य मिळविण्यासाठी कृषि विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

लातूर, दि.19 (जिमाका):  सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत खातेदाराकडून संमती पत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून कृषी विभागामार्फत सुरू आहे. ई-पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी ग्रामस्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यातील शेतकऱ्यांना प्रती शेतकरी 2 हेक्टरच्या मर्यादेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5 हजार रुपये हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. याकरिता संमतीपत्र व आधार क्रमांक जमा न केलेल्या लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संबंधित कृषि सहाय्यक किंवा लातूर तालुका कृषि अधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ई-पीक पाहणी नोंदणीनुसार शेतकरी खातेदारांच्या याद्या कृषी विभागाने गाव निहाय ठळक ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या आहेत. परंतू लातूर तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये अद्यापही काही शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहायक यांच्याकडे संमती पत्र व आधार क्रमांक जमा केले नाही. 21 सप्टेंबर पासून योजनेअंतर्गत पात्र खातेदारांना अर्थसाह्याचा लाभ प्रत्यक्षात वितरित करावयाचा असल्याने उर्वरित वैयक्तिक व सामायिक खातेदार यांच्याकडून संमतीपत्र प्राप्त करून घेणे, प्राप्त संमतीपत्र माहिती पोर्टलवर भरणे आवश्यक असल्याने माहिती न भरल्यामुळे काही लाभार्थी वेळेवर मदत मिळण्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी लातूर तालुक्यातील शिल्लक खातेदारांनी संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे संमतीपत्र जमा करावेत.

विशेषतः लातूर शहरानजीक असलेल्या बाभळगाव, कातपूर, सारोळा, लातूर, हणमंतवाडी, आर्वी, सिकंदरपुर, महाराणा प्रताप नगर, मळवटी, कव्हा, चांडेश्वर, खोपेगाव, बोरवटी, कासारगाव, गंगापूर, वासनगाव, पाखरसांगवी खाडगाव, वरवंटी, बसवंतपूर, हरंगुळ, नांदगाव व खंडापूर, आदी गावातील यादीतील शिल्लक खातेदारांनी संमतीपत्र 20 सप्टेंबरपर्यंत संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करावेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सोमाणी बिल्डिंग, जुना औसा रोड, लातूर या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु