लातूर जिल्ह्यात आज ‘एक पेड माँ के नाम’ अभियान
लातूर जिल्ह्यात आज ‘एक पेड माँ के नाम’ अभियान
• प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार होणार वृक्ष लागवड
• प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावण्याचे आवाहन
लातूर, दि. १६ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनी केलेल्या आवाहनानुसार लातूर जिल्ह्यात ‘एक पेड माँ के नाम’ अभियान १७ सप्टेंबर २०२४ रोजी राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड केली जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
प्रत्येकाने आपल्या आईसोबत किंवा आईला अभिवादन म्हणून यंदाच्या पावसाळ्यात देशी प्रजातीचे किमान एक झाड लावल्यास, आईसाठी ही अनमोल भेट ठरेल, या संकल्पनेतून ‘एक पेड माँ के नाम’ हे अभियान राबविले जात आहे. निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे. याकरिता १७ सप्टेंबर रोजी विशेष वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होवून प्रत्येकाने आपल्या आईसोबत किंवा आईला अभिवादन म्हणून किमान एक तरी झाड लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वृक्ष लागवड केल्यानंतर या झाडासोबतचे छायाचित्र https://merilife.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment