रविवारी शौर्य दिनाचे आयोजन

 रविवारी शौर्य दिनाचे आयोजन

 

लातूर, दि.25 (जिमाका) :  29 सप्टेंबर, 2016 रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तन हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला . भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्यानुसार 29 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, बार्शी रोड , लातूर येथे शौर्य दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व शौर्यपदक धारकांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.

लातूर जिल्ह्यातील शहीद जवानांचे वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, शौर्यपदकधारक, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी तसेच शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी यांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु