लातूर येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहात अशासकीय स्वयंपाकी पदासाठी 20 सप्टेंबर रोजी मुलाखती
लातूर येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहात
अशासकीय स्वयंपाकी पदासाठी 20 सप्टेंबर रोजी मुलाखती
लातूर, दि. 10 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय लातूर यांच्या आस्थापनेवरील सैनिकी वसतिगृह लातूर येथे अशासकीय स्वयंपाकी पद तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन प्रतिमहा रक्कम 13 हजार 924 रुपये प्रमाणे भरण्यात येणार आहे.
तरी इच्छूक माजी सैनिक पत्नी, विधवा तसेच इतर नागरी महिला उमेदवारांनी आपल्या अर्ज व सर्व मूळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी 20 सप्टेंबर, 2024 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय लातूर येथे स्वत: उपस्थित रहावे व निवड करण्यात आलेल्या उमेदवारास तात्काळ कामावर घेण्यात येणार आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment