पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते 15 ऑगस्टला मुख्य शासकीय ध्वजारोहण
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते 15 ऑगस्टला मुख्य शासकीय ध्वजारोहण लातूर, दि. 15 (जिमाका) : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूर जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले शुक्रवार, 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी लातूर येथे दाखल होतील. शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम राहणार आहे. शनिवार, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.45 वाजता ते शासकीय विश्रामगृहातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन होईल. सकाळी 9.05 वाजता त्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल. यानंतर सकाळी 9.45 वाजता ते शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील.सकाळी 10 वाजता विश्रामगृहात आगमन राखीव. सकाळी 10.45 वाजता ते लातूर येथील जुनी एमआयडीसीकडे प्रयाण करतील. सकाळी 11 ते 11.15 वाजत...