लातूर येथे २४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद
लातूर येथे २४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद
लातूर, दि. १७ (जिमाका) : उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायिकांची जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे २४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. जिल्हातील गुंतवणूक वाढवणे व नव उद्योजकांना आकर्षित करणे, जिल्हयातील गुंतवणूकदार आणि व्यवसायीकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, लातूर जिल्हा विकासासाठी केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचा उद्देश आहे.
जिल्ह्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नवउद्योजकांसोबत व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करार करुन, नव उद्योजकांना एमओयु वितरीत करण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील नव उद्योजकांनी जिल्हा उद्योग केंद्र, प्लॉट नं.पी-५, एम.आय.डी.सी.लातूर येथे आपल्या नव उद्योग, व्यवसायाची माहिती देण्याचे आवाहन उप आयुक्त (उद्योग व सेवा) आवाहन लातूर येथील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक उद्योग अधिकारी (मो.क्र. ७३९७८३०५८८) यांच्याशी संपर्क साधावा.
****
Comments
Post a Comment