प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
वृत्त क्र. : 420
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी
३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. २३ (जिमाका): केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी लातूर जिल्ह्यातील पात्र व गुणवंत बालकांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन लातूरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव यांनी केले आहे.
शिक्षण, कला व सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य आणि शौर्य यांसारख्या विविध क्षेत्रांत विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेल्या ५ वर्षांपेक्षा अधिक आणि १८ वर्षांपर्यंतच्या अशा बालकांना हा पुरस्कार दिला जातो.
केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार या पुरस्कारासाठीची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवारांचे अर्ज १ एप्रिल ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत केवळ https://awards.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच स्वीकारले जातील. या संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा ऑफलाईन पद्धतीने प्राप्त होणारे नामनिर्देशन अर्ज स्विकारले जाणार नसल्यामुळे, जिल्ह्यातील पात्र बालकांनी विहित वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment