‘नीट’ परीक्षेसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

*वृत्त क्र. : 401* ‘नीट’ परीक्षेसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन लातूर, दि. १७ : राष्ट्रीय परीक्षा एजेंसीमार्फत नीट युजी २०२६ ही परीक्षा रविवार, २१ जून २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेच्या कामकाजासाठी आणि आवश्यक समन्वयासाठी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टवोड यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचे प्रमुख म्हणून तहसीलदार (संगायो) राजाभाऊ कदम (भ्रमणध्वनी क्र. ९९२२८४२००१) यांची, तर नियंत्रण कक्ष सहाय्यक म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर ढमाले (भ्रमणध्वनी क्र. ९४०५२८१०९८) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षार्थी, पालक आणि संबंधित यंत्रणांच्या सोयीसाठी या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२३८२-२२०२०४ असा आहे. परीक्षेशी संबंधित विविध विभागांच्या समन्वयासाठी आरोग्य विभाग, पोलीस दल, लातूर महानगरपालिका, महावितरण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि तंत्रशिक्षण संस्था अशा विविध विभागांतील एकूण ८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती या नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. हे सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचारी २० आणि २१ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत दोन्ही दिवस जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परीक्षेच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करतील. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत