१०० मिमी पाऊस आणि जमिनीत ६ इंच ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
*वृत्त क्र. : 418*
१०० मिमी पाऊस आणि जमिनीत ६ इंच ओल झाल्याशिवाय
शेतकऱ्यांनी पेरणी करू नये; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
लातूर, दिनांक २४ (जिमाका): जून महिना आता शेवटच्या टप्प्यात आला असला, तरी लातूर जिल्ह्यात अद्याप पुरेशा प्रमाणात पावसाचे आगमन झालेले नाही. आजपर्यंत जिल्ह्यात केवळ ५१.७ मिलीमीटर एवढ्याच पावसाची नोंद झाली असून, जमिनीमध्ये पेरणीसाठी आवश्यक असलेली ओल तयार झालेली नाही. या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत जिल्ह्यात किमान १०० मिलीमीटर पाऊस पडत नाही आणि जमिनीमध्ये ६ इंचांपर्यंत ओल जात नाही, तोपर्यंत शेतकरी बांधवांनी घाईघाईने पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
अपुऱ्या पावसावर पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन आणि जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे कृषी विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment