अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर पुरवठा योजनेसाठी १० जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
* वृत्त क्र. : 417*
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना
मिनी ट्रॅक्टर पुरवठा योजनेसाठी १० जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. २४ (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ८ मार्च २०१७ च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन स्तरावरून निश्चित करण्यात आल्या असून, हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांच्या निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.
लातूर जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र बचत गटांकडून सन २०२६-२०२७ या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र बचत गटांनी आपले अर्ज पूर्ण भरून येत्या १० जुलै २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, लातूर या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन लातूर समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
Comments
Post a Comment