लातूर येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १ जुलैपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

*वृत्त क्र. : 419* लातूर येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १ जुलैपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू लातूर, दि. २४ (जिमाका): लातूर येथील बार्शी रोडवर असलेल्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ करिता कनिष्ठ महाविद्यालय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १ जुलै, २०२६ पासून सुरू होत आहे. अनुसूचित जमातीच्या इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी 'www.swayam.mahaonline.gov.in' या संकेतस्थळावर जाऊन आपले वसतिगृह प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज विहित मुदतीत सादर करावेत. या प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी टोल फ्री क्रमांक १८००२६७०००७ वर संपर्क साधावा, असे आवाहन लातूर येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत