लातूर जिल्ह्यात रविवारी ३२ परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा • परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

*वृत्त क्र. : 383* लातूर जिल्ह्यात रविवारी ३२ परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा • परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. ११ : जिल्ह्यात रविवार, १४ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ दरम्यान ३२ उपकेंद्रांवर महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा-२०२६ आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात परीक्षेदिवशी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केले आहे. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थींशिवाय पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असून, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास किंवा शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच परीक्षा कालावधीत केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ आणि ध्वनिक्षेपक ही सर्व माध्यमे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, सेल्युलर फोन किंवा इतर कोणतीही प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल, तसेच कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला किंवा वाहनाला केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. हे निर्बंध परीक्षा कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस प्रशासनास लागू नसून, परीक्षेचे कामकाज शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत