तूर जिल्हा क्रीडा संकुलात २३ जून रोजी ‘जागतिक ऑलिम्पिक डे’ चे आयोजन
*वृत्त क्र. : 412* *दिनांक : 22 जून,2026*
लातूर जिल्हा क्रीडा संकुलात २३ जून रोजी
‘जागतिक ऑलिम्पिक डे’ चे आयोजन
लातूर, दि. २२ (जिमाका): जागतिक क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च महोत्सव असलेल्या ऑलिम्पिकच्या स्थापना दिनानिमित्त येत्या २३ जून २०२६ रोजी लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील लॉन टेनिस मैदानावर सायंकाळी ४ वाजता ‘जागतिक ऑलिम्पिक डे’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. २३ जून १८९४ रोजी ग्रीस येथे पियरे डी कौबर्टिन यांनी ऑलिम्पिकची स्थापना केली होती आणि याच ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’सह जगातील २०० हून अधिक ऑलिम्पिक संघ हा दिवस ‘ऑलिम्पिक डे’ म्हणून साजरा करतात.
या सोहळ्यात राष्ट्रीय व राज्य पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, त्यासोबतच क्रीडा क्षेत्रातील घडामोडी व मार्गदर्शनासाठी विशेष चर्चासत्र, कार्यशाळा आणि परिसंवादाचे (सेमिनार) आयोजन केले गेले आहे. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक आणि क्रीडाप्रेमी सामान्य नागरिकांनी २३ जून रोजी सायंकाळी ४ वाजता जिल्हा क्रीडा संकुलात उपस्थित राहून या क्रीडा महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment