लातूर येथे आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
वृत्त क्र. : 422
लातूर येथे आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. २४ (जिमाका): लातूर शहरामध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता अकरावीपासून पुढील वर्गातील सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन), शंभू नगर, लातूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मधील ३३ नवीन जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अनुसूचित जमातीच्या पात्र विद्यार्थ्यांनी 'www.swayam.mahaonline.gov.in' या संकेतस्थळावर १ जुलै, २०२६ पासून आपले वसतिगृह प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज सादर करावेत. या प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी टोल फ्री क्रमांक १८००२६७०००७ वर किंवा प्रत्यक्ष वसतिगृहाच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आणि लातूर वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment