लातूर येथे ‘अमृत’ संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी आज ‘उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमा’चे आयोजन

लातूर येथे ‘अमृत’ संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी आज ‘उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमा’चे आयोजन लातूर, दि. ०१ : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’ मार्फत राबविण्यात येत असलेल्या अमृत पर्यटन उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी मंगळवार, २ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अमृत लातूर जिल्हा कार्यालय, पहिला मजला, पितृछाया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट, सिग्नल कॅम्प, विद्यानगर, लातूर-४१३५१२ येथे होणार आहे. ‘अमृत पर्यटन’ हा महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला गती देण्यासाठी, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी आणि पर्यटनाशी संबंधित उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत असलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील पर्यटन स्थळे, पर्यटन सेवा, स्थानिक उत्पादने आणि पर्यटन व्यवसायांना नवीन बाजारपेठ व संधी उपलब्ध करून देण्याचे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पर्यटन क्षेत्र हे सध्या देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून, यामध्ये व्यवसाय विस्तार, रोजगार आणि आर्थिक प्रगतीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ स्थानिक उद्योजकांना घेता यावा आणि त्यांना आधुनिक व्यवसाय व्यवस्थापन कौशल्ये प्राप्त व्हावीत, या उद्देशाने या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात टूर आणि ट्रॅव्हल्स व्यावसायिक, टुरिस्ट गाईड्स, कुक आणि केटरर्स, होमस्टे व रिसॉर्ट संचालक, पर्यटन सेवा पुरवठादार, धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाशी संबंधित उद्योजक तसेच पर्यटन क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती सहभागी होऊ शकतात. या कार्यशाळेदरम्यान सहभागी उद्योजकांना व्यवसाय उभारणी व विस्तारासाठी आवश्यक असणारे प्रभावी नियोजन, आधुनिक विपणन तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग, पर्यटन क्षेत्रातील नवीन संधी आणि शासनाच्या विविध योजना व आर्थिक सहाय्याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार असून, या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ व यशस्वी उद्योजकांकडून प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. तरी लातूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व उद्योजक, व्यावसायिक आणि इच्छुक युवक-युवतींनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी अमृतचे लातूर जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर (भ्रमणध्वनी क्र. ७३९१०६५४७०) या क्रमांकावर संपर्क साधता येईल. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत