सर्वोच्च न्यायालयात २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान विशेष लोकअदालत

*वृत्त क्र. : 413* *दिनांक : 22 जून,2026* सर्वोच्च न्यायालयात २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान विशेष लोकअदालत लातूर, दि. २२ (जिमाका): सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत 'समाधान समारोह' या उपक्रमांतर्गत २१ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात 'विशेष लोक अदालतीचे' आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतीमध्ये लातूर जिल्ह्यातून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली सर्व प्रकारची प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी व दिवाणी प्रकरणे ठेवण्यात आली असून, यामध्ये प्रामुख्याने बँकिंग, दिवाणी, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई, ग्राहक तक्रार निवारण, परक्राम्य संलेख अधिनियम कलम १३८ अंतर्गत धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणे, कौटुंबिक वाद, कामगार व औद्योगिक वाद, भूसंपादन आणि सेवेशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकारांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरणात यशस्वी तडजोड व्हावी, या हेतूने नोटिसा बजावण्यात आल्या असून, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूरचे सचिव व्यंकटेश गिरवलकर व प्रशिक्षित मध्यस्थ वकील यासाठी निरंतर प्रयत्न करत आहेत. तरी लातूर जिल्ह्यातून सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रकरणांमधील संबंधित पक्षकारांनी आपले वाद सामोपचाराने मिटवून प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीस संजय भारुका, सचिव व्यंकटेश गिरवलकर आणि लातूर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष शिवकुमार जाधव यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत