नौदल माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी १९ जून रोजी लातूर येथे विशेष बैठक

नौदल माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी १९ जून रोजी लातूर येथे विशेष बैठक लातूर, १५ (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व नौदल माजी सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मुंबई येथील नौदल अधिकारी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत १९ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मुंबईहून येणारे नौदल अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून, ते माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या, तसेच प्रलंबित प्रश्न जाणून घेणार आहेत. तरी आपल्या अडीअडचणी व समस्या मांडण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व नौदल माजी सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी आणि अवलंबितांनी १९ जून रोजी सकाळी १० वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन लातूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत