महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध कर्ज आणि अनुदान योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध कर्ज आणि अनुदान योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. १२ (जिमाका): महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय लातूर यांच्या वतीने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ५० टक्के अनुदान योजनेअंतर्गत ३५, बीजभांडवल योजनेअंतर्गत ३५ आणि थेट कर्ज योजनेअंतर्गत ७० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील (मांग, मातंग, चांभार व खाटीक वगळून) गरजू लाभार्थ्यांकडून https://mahadisha.mpbcdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी लाभार्थ्यांची वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे असणे अनिवार्य असून, ऑनलाईन अर्ज करताना जातीचा व उत्पन्नाचा मूळ दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, रेशनकार्डची झेरॉक्स प्रत, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, आधार लिंक असलेल्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, टी.सी. व मार्क मेमोसारखी शैक्षणिक कागदपत्रे, व्यवसायाचे कोटेशन, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, उद्यम आधार, शॉप ॲक्ट, संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण किंवा अनुभव प्रमाणपत्र आणि दोन पासपोर्ट साईझ फोटो इत्यादी कागदपत्रांची प्रामुख्याने आवश्यकता आहे. संकेतस्थळावर यशस्वीरित्या ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर, त्या अर्जाच्या दोन प्रती शिवनेरी गेट समोरील जुनी डालडा फॅक्टरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या तळमजल्यावर असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जमा करणे आवश्यक आहे. या योजनेची सविस्तर माहिती पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांनी वेळेत ऑनलाईन अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे लातूर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत