औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक; लातूर जिल्ह्यातील २३ ऑक्टोबरचे आठवडी बाजार बंद
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक;
लातूर जिल्ह्यातील २३ ऑक्टोबरचे आठवडी बाजार बंद
लातूर, दि. २१ : येत्या शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी ०५- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना आपला मतदानाचा हक्क सुलभतेने बजावता यावा आणि संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी लातूर जिल्ह्यातील शुक्रवारी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य पणन संचालक संजय कदम यांनी मार्केट अॅाण्ड फेअर अॅलक्ट १८६२ च्या कलम ५ (अ) अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करत २३ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या मतदानाच्या दिवशी लातूर जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्यास संमती दर्शवली आहे
*****
Comments
Post a Comment