लातूर जिल्ह्यात १७३ गावांसाठी २५६ विहिरींचे अधिग्रहण
लातूर जिल्ह्यात १७३ गावांसाठी २५६ विहिरींचे अधिग्रहण
लातूर, दि. २१ (जिमाका) : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी प्रशासनामार्फत विविध तालुक्यांमध्ये खाजगी विहिरी व विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १० तालुक्यांपैकी निरनिराळ्या गावांमध्ये व वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एकूण २५६ विहिरींचे आणि विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
यामध्ये लातूर तालुक्यात १३ गावांसाठी १९ विहिरी, औसा तालुक्यात ३२ गावांसाठी ५१ विहिरी, रेणापूर तालुक्यात २१ गावांसाठी २८ विहिरी, उदगीर तालुक्यात ७ गावांसाठी ७ विहिरी, अहमदपूर तालुक्यात ३८ गावांसाठी ४१ विहिरी, चाकूर तालुक्यात १७ गावांसाठी १७ विहिरी, देवणी तालुक्यात ११ गावांसाठी २४ विहिरी, निलंगा तालुक्यात २५ गावांसाठी ४५ विहिरी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात ९ गावांसाठी २४ विहिरींचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १७३ गावे व वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी २५६ विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करून नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.
*****
Comments
Post a Comment