Posts

Showing posts from September, 2021

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री अमित देशमुख

Image
  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन कटीबध्द                                                               - पालकमंत्री अमित देशमुख *पूर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन अहवाल सादर करावा * पिक विमा संदर्भातील अर्ज गावपातळीवर स्वीकारली जाणार   लातूर,दि.30 (जिमाका) जिल्ह्यात मागील तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री लातूर जिल्हा अमित देशमुख यांनी केले.      निलंगा तालुक्यातील गौर येथे मांजरा नदीच्या पुरामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान पाहणी वेळी त...

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमार्फत क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन

  *जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमार्फत* *क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन* लातूर दि.29 (जिमाका):- क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी कामगीरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. क्रीडा व सेवा संचालनालय व आर्मी स्पोर्ट इन्स्ट्यूट   यांच्या संयूक्त विद्यमाने स्पोर्टस कंपनी, पुणे येथील प्रवेशाकरिता क्रीडा नैपुण्य चाचण्याचे आयोजन करण्यात आले आहे.   या चाचण्यात वय वर्षे 8 ते 14 वर्षाखालील मुले सहभाग घेऊ शकतात                       दि.1 जानेवारी 2022 रोजी वय वर्षे 8 ते 14 असणे आवश्यक राहील.   यात डायव्हिंग या प्रकारासाठी 8 ते 12 वयोगट राहील व ॲथलेटीक्स, बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिप्टिंग यासाठी वयोगट 10 ते 14 वर्षे राहील. या चाचण्याचे आयोजन दि.4 ते 7 ऑक्टोबर 2021 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकूल,लातूर येथे सकाळी ठीक 11-00 वाजेपासून घेण्यात येईल. विविध खेळ प्रकारासाठी वेगवेगळया शारिरीक चाचण्या रनिंग, व्हर्टीकल जम्प, कॅनेडिअन बीफ टेस्...

जिल्हयात पुरात अडकलेल्या 87 नागरिकांची सुखरुप सुटका § पोहरेगाव येथील तीन व्यक्तींची हेलिकॉप्टरद्वारे सुटका § अडकलेले 46 तर 7 कुटूंबिंयाचे स्थलांतर § वाहून गेलेल्या दोघांचा शोध कार्य सुरु

  जिल्हयात पुरात अडकलेल्या 87 नागरिकांची सुखरुप सुटका   §   पोहरेगाव येथील तीन व्यक्तींची हेलिकॉप्टरद्वारे सुटका §   अडकलेले 46 तर 7 कुटूंबिंयाचे स्थलांतर §   वाहून गेलेल्या दोघांचा शोध कार्य सुरु           लातूर,दि.29(जि.मा.का) :- जिल्हयात दिनांक 27 व 28 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टी व पाटबंधारे विभागाकडून मांजरा व निम्न तेरणा प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या विसर्गातील पाण्यामुळे पूर परिस्थितीबाबत प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाने   कळविली आहे.           जिल्हा आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरण लातूर यांच्याकडून पूरात अडकलेल्या व्यक्तींची सुटका / बचाव करण्यासाठी स्थानिक पातळीवर पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या पथकात रबर बोट ओबीएम मशीनसह इतर पूरासंबंधी आवश्यक साहित्य सामुग्रीसह अडकलेल्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. दि.28 व 29 सप्टेंबर, 2021 रोजी सुटका केलेले गावाचे नाव, पथक प्रमुख / संपर्क क्रमांक, सुखरुप सुटका केलेले/स्थलांतर केलेले व्यक्तींची माहिती पूढील...

*अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी* *प्रमाणपत्रे काढण्यासाठी विशेष मोहिम*

  *अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी* *प्रमाणपत्रे काढण्यासाठी विशेष मोहिम*            लातूर,दि.29(जि.मा.का) :- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद कार्यालयातंर्गत औरंगाबाद, जालना, लातूर, बीड या चार जिल्ह्यांचा समावेश असुन अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) लाभार्थ्यांसाठी न्युक्लीअस बजेट योजनेतंर्गत जात प्रमाणपत्र काढणे, आधारकार्ड काढणे, शिधा पत्रिका काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.                              या कार्यालयाच्या अधिनिस्त असलेल्या शासकीय आश्रम शाळा, अनुदानीत आश्रम शाळा व शासकीय वसतीगृहातील कर्मचारी यांच्यामार्फत संभाव्य लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करणे, कागदपत्रे उपलब्ध्‍ करुन घेणे ई. कामे शासकीय यंत्रणेमार्फत सुरु आहेत. ही सर्व कामे शासकीय यंत्रणा शासनाच्या / प्रकल्प कार्यालयाच्या अधिनिस्त असल्याने यासाठी सर्वेक्षणाच्या वेळी अथवा कागदपत्रे जमा करताना लाभार्थ्यां...

जिल्ह्याच्या चौफेर विकासाला मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील थोर हुतात्म्याच्या बलिदानाची उर्जा --- राज्यमंत्री संजय बनसोडे

Image
  जिल्ह्याच्या चौफेर विकासाला मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील थोर हुतात्म्याच्या बलिदानाची उर्जा   --- राज्यमंत्री संजय बनसोडे §                                          जिल्ह्यात विविध ठिकाणी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण   लातूर,दि.17 (जिमाका):- जिल्ह्यात सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती होत असून आजच्या लातूर जिल्ह्याच्या चौफेर विकासाला मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील थोर हुतात्म्यांच्या बलिदानाची उर्जा लाभली असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी प्रतिपादन केले. येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ टाऊन हॉल लातूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या ध्वजारोहण कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे, महानगरपालिकेचे ...

मसलगा मध्यम प्रकल्प तलावापासून 500 मिटर अंतरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

  मसलगा मध्यम प्रकल्प तलावापासून 500 मिटर अंतरात प्रतिबंधात्मक आदेश जारी           लातूर दि.29 (जि.मा.का) मसलगा मध्यम प्रकल्प 89.23 टक्के भरले असून धरणाच्या सर्व 06 दरवाज्याव्दारे पाण्याचा विसर्ग नदीत करण्यात येत आहे. या ठिकाणी भरलेले धरण व पाण्याचा विसर्ग पाहण्याकरीता नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणस्थळी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त उपलब्ध्‍ करुन देणे व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात यावे अशी कार्यकारी अभियंता लातूर पाटबंधारे विभाग क्र.1 यांनी विनंती केली आहे.          जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन मौजे मसलगा ता. निलंगा मध्यम प्रकल्प येथील साठवण तलावापासून 500 मीटर पर्यंतच्या अंतरात प्रतिबंधात्मक आदेश तात्काळ प्रभावाने जारी केले आहेत. तथापी हे आदेश सदर ठिकाणी शासकीय कामासाठी लागणारे अधिकारी / कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत.     ...

तावरजा मध्यम प्रकल्प तलावापासून 500 मिटर अंतरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

    तावरजा मध्यम प्रकल्प तलावापासून 500 मिटर अंतरात प्रतिबंधात्मक आदेश जारी           लातूर दि.29 (जि.मा.का) तावरजा मध्यम प्रकल्प 90.65 टक्के भरले असून या ठिकाणी भरलेले धरण व पाण्याचा विसर्ग पाहण्याकरीता नागरिकांची गर्दी होत आहे.सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणस्थळी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त उपलब्ध्‍ करुन देणे व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात यावे अशी कार्यकारी अभियंता लातूर पाटबंधारे विभाग क्र.1 यांनी विनंती केली आहे.           जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन तावरजा मध्यम प्रकल्प येथील साठवण तलावापासून 500 मीटर पर्यंतच्या अंतरात प्रतिबंधात्मक आदेश तात्काळ प्रभावाने जारी केले आहेत. तथापी हे आदेश सदर ठिकाणी शासकीय कामासाठी लागणारे अधिकारी / कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत.

पोहरेगाव येथील मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांना आज हेलिकॉप्टरच्या सह्याने सुखरूप बाहेर काढले

Image
  पोहरेगाव येथील मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांना आज हेलिकॉप्टरच्या सह्याने सुखरूप बाहेर काढले           लातूर दि.29 (जि.मा.का) मांजरा नदीच्या पाण्यात पोहरेगाव येथील शेतात अडकलेल्या नागोराव किसन टिकणारे ( वय 50 ), पत्नी रुक्माबाईं ( वय 45) आणि त्यांचा मुलगा          चंद्रकांत (वय 11) यांची भारतीय वायू सेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने यशस्वीरित्या सुटका करण्यात आली.               काल सायंकाळी हे हेलिकॉप्टर लातूर विमानतळात दाखल झाले होते. सदरील शोध व बचाव मोहीम पालकमंत्री अमित देशमुख व जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही कामगिरी भारतीय वायुसेनेचे पायलट श्री. प्रतीक बऱ्हाणंपुरे व त्यांच्या पथकाने पार पाडली. जिल्हाधिकारी यांच्या सुचनेवारून हेलिकॉप्टर सोबत   मार्गदर्शनासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी    हे उपस्थित होते.               ...

लातूर तालुक्यातील टाकळी येथे पालकमंत्री ना अमित देशमुख यांच्याकडून मदत व बचाव कार्याची पाहणी जोखीम पत्करून मदत करणाऱ्या पथकाचे कौतुक ग्रामस्थांना दिला धीर

Image
  लातूर तालुक्यातील टाकळी येथे पालकमंत्री ना अमित देशमुख यांच्याकडून मदत व बचाव कार्याची पाहणी जोखीम पत्करून मदत करणाऱ्या पथकाचे कौतुक ग्रामस्थांना दिला धीर लातूर दि.28 (जि.मा. का ) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने लातूर येथे दाखल झालेल्या पालकमंत्री अमित देशमुख यांनी प्रारंभी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत बैठक घेतल्यानंतर सायंकाळी लातूर तालुक्यातील टाकळी येथे जाऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून करण्यात येत असलेल्या बचाव व मदत मोहिमेची माहिती घेतली. पथकातील सदस्यांना प्रोत्साहन दिले, शिवाय ग्रामस्थांनाही धीर दिला.   मांजरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने टाकळी येथील काही शेतकरी शेतवस्तीवरच अडकले आहेत. त्यांच्या चोहोंबाजुनी पाण्याने वेढा दिल्यामुळे त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाच्या वतीने मोहिम राबविण्यात येत आहे. सांयकाळी अंधार असतानाही मोठी जोखीम पत्करुन हे पथक कार्यवाही करत आहे. या पथकाला प्रोत्साहन देण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख, माजी आमदार व...

*पालकमंत्री नामदार अमित विलासराव देशमुख तातडीने लातूरमध्ये दाखल* *अतिवृष्टी व पूर परिस्थिती संदर्भात घेतला आढावा* *युध्दपातळीवर मदत कार्य राबविण्याचे निर्देश*

Image
  *पालकमंत्री नामदार अमित विलासराव देशमुख तातडीने लातूरमध्ये दाखल* *अतिवृष्टी व पूर परिस्थिती संदर्भात घेतला आढावा* *युध्दपातळीवर मदत कार्य राबविण्याचे निर्देश*   लातूर दि.28 (जि. मा. का ): लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीचा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी येथील विमानतळावर जिल्हा प्रशासन, पोलिस, कृषी, पाटबंधारे यासह विविध विभागाचे अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली. आपादग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी युध्दपातळीवर यंत्रणा राबविण्याचे निर्देश यावेळी दिले.   मागच्या दोन दिवसात लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन पुर परिस्थीती उद्भवल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. या परिस्थितीची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख हे मंगळवारी दुपारी तातडीने लातूर येथे दाखल झाले. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, महापालिका आयुक्त अमन मित्तल, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्...

औसा-तुळजापूर चार पदरी मार्ग उजनी जवळील तेरणा नदीच्या पुलाचे पाणी वाढत असल्यामुळे बंद

    औसा-तुळजापूर चार पदरी मार्ग उजनी जवळील तेरणा नदीच्या पुलाचे पाणी वाढत असल्यामुळे बंद   लातूर दि.28 ( जि.मा.का ):-   महाराष्ट्रासह लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊसामुळे तेरणा नदी उजनी औसा जि. लातूर जवळच्या पुलावर एचएफल 0.5 मीटर किंवा त्याहून अधिक वर वाहत आहे. नदीच्या पुलावरील पाण्याची पातळी आणखीन वाढत असल्याने सद्याच्या पुलावर महामार्गावर वाहतूक चालविणे असुरक्षित आहे. त्यामुळे रस्ता वापरकर्त्याच्या सुरक्षिततेचा विचार करुन पातळी एचएफएलच्या खाली येईपर्यंत पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येत आहे. त्यामुळे औसा - तुळजापूर हा चार पदरी मार्ग उजनी जवळील तेरणा नदीच्या पुलाचे पाणी वाढत असल्यामुळे बंद करण्यात येत असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, नांदेड यांनी कळविले आहे. 0000      

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टिमने 47 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचविले

Image
  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टिमने 47 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचविले लातूर दि.28 ( जि.मा.का ):- पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सुचनेनुसार आणि पृथ्यीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टिमने सकाळपासून सारसा या गावातील पुरात अडकलेल्या 47 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. यातून अनेकांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या होत्या. यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टिमने नागरिकांना बाहेर काढण्याची कार्यवाही केली सकाळी 11-30 ते सांयकाळी 5-30 वेळेपर्यंत ही कार्यवाही सुरु होती. पूरपरिस्थितीतून आज सारसा ता. रेणापूर येथील 47 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यात आले .   या कार्यवाहीत उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, नायब तहसीलदार राजेश जाधव, गटविकास अधिकारी शाम गोडभरले, मंडळ अधिकारी श्रीमती अकोले , तलाठी मादळे, सहाय्य्क पोलीस निरीक्षक श्री. ढोणे तसेच सारसा येथील ग्रामसेवक आदींचा सहभाग होता. 0000    

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची टीम लातूरमध्ये दाखल पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली चर्चा

Image
  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची टीम लातूरमध्ये दाखल पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली चर्चा लातूर दि.28 ( जि.मा.का ):- लातूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत अडकलेल्या अनेक नागरिकांना जिल्हा प्रशासनाने बाहेर काढले आहे. अजूनही पावसाची शक्यता लक्षात घेऊन पालकमंत्री अमित देशमुख यांनी    राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन टीम ला पाचरण करण्याची सूचना केली होती. ती टीम आज लातुरात पोहचली आहे.      लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख हे वेळोवेळी प्रशासनाला सूचना देत आहेत. त्यानुसार सकाळ पासून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन टीम कार्यरत असून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचविले आहे. संध्याकाळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची टीम आली असून पालकमंत्री अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी त्यांच्या बरोबर चर्चा केली. या टीमला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती, पूरग्रस्त गावे याची माहिती दे...

‘’थोडेसे माय बापासाठी पण ’’ या उपक्रमांतर्गत जिल्‍हयातील सर्व जेष्‍ठ नागरिकांचा सत्‍कार

    ‘’ थोडेसे माय बापासाठी पण ’’ या उपक्रमांतर्गत जिल्‍हयातील सर्व जेष्‍ठ नागरिकांचा सत्‍कार   लातूर,दि.28 (जिमाका):- सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाकडून , ‘’ थोडेसे माय बापासाठी पण ’’ या उपक्रमाअंतर्गत आपले सर्वांचे कर्तव्‍य म्‍हणून जिल्‍हयातील सर्व जेष्‍ठ नागरीकाचा उचित सन्‍मान करून त्‍यांची सामाजिक प्रतिमा उंचावण्‍यासाठी दिनांक ०१ ऑक्‍टोबंर २०२१ रोजी जिल्‍हाभरामध्‍ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.   शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प.लातूर - जिल्‍हयातील सर्व जेष्‍ठ नागरीकांना शाळेत बोलवून त्‍यांचा सत्‍कार करणे व विद्यार्थ्‍यांना त्‍यांचे जिवना विषयक अनुभव अदान प्रदान करणे. शिक्षणाधिकारी (मा.) जि.प.लातूर- जिल्‍हयातील सर्व जेष्‍ठ नागरीकांना शाळेत बोलवून त्‍यांचा सत्‍कार करणे व विद्यार्थ्‍यांना त्‍यांचे जिवना विषयक अनुभव अदान प्रदान करणे. उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्‍याण) जि.प.लातूर - जिल्‍हयातील सर्व अंगणवाडीमध्‍ये जेष्‍ठ नागरीकांना बोलावून त्‍यांचा उचित सत्‍कार व सन्‍मान करणे. जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी , जि.प.लातूर- जिल्‍हयातील सर्व उपकें...