अहमदपूर तालुक्यातील जल जिवन मिशन अभियान कार्यक्रमाची आढावा बैठक

 

              अहमदपूर तालुक्यातील जल जिवन मिशन अभियान कार्यक्रमाची आढावा बैठक

   ■ पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे अध्यक्षतेखाली

मुंबई, दि. 21: जे. जे. एम. मध्ये तयार करावयाच्या प्रादेशिक योजने मध्ये अहमदपूर तालुक्यात येणारी  10 गावे आणि जळकोट तालुक्यात येणारी 8 गावे यांसाठी दोन वेगळ्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना करण्यात यावे अशा सूचना  पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री संजय बनसोडे यांनी केल्या.

राष्ट्रीय  ग्रामीण पेयजल कार्यक्रम कृती आराखडाअंतर्गत लातूर जिल्हयातील अहमदपूर तालुक्यातील अस्तित्वातील जुन्या योजनांपैकी  18 गावांसाठी नव्याने प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजुरीबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला आमदार बाबासाहेब पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, जल जीवन अभियनाचे संचालक, ऋषिकेश यशोद लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिनव गोयल, औरंगाबादच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. बनसोडे म्हणाले की, ग्रामीण भागात दरडोई 55 लिटर प्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वतता टिकून राहण्यासाठी राज्यात जल जीवन अभियान  राबविण्यात येत आहे. 18 गावांना एकत्र पाणीपुरवठा करताना काही अडचणी समोर येत असल्याने अहमदपूर आणि जळकोट तालुक्यांसाठी वेगळया पध्दतीचे नियोजन करण्यात यावे. पाणी पुरवठा जरी एकाच जॅकवेल मधून करण्यात येणार असला तरी दोन तालुक्यातील गावांसाठी वेगळी पाईपलाईन यंत्रणा कार्यान्वित करावी.

तसेच लातूर जिल्ह्यासाठी नेमण्यात आलेल्या वॅप्कॉस या सल्लागार कंपनी द्वारे सर्व योजनांचे आराखडे ऑक्टोबर 2021 अखेर पूर्ण करण्यात यावेत.

 

                                                      ****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा