जिल्हा माहिती अधिकारी पदाचा युवराज पाटील यांनी पदभार स्वीकारला

 

जिल्हा माहिती अधिकारी पदाचा

युवराज पाटील यांनी पदभार स्वीकारला

लातूर,दि.14(जिमाका):-येथील जिल्हा माहिती कार्यालयातील जिल्हा माहिती अधिकारी या पदाचा आज युवराज पाटील यांनी पदभार स्वीकारला असून यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी यापुर्वी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील मुख्यालय मुंबई येथे सहाय्यक संचालक (विभागीय संपर्क अधिकारी) पुणे, अकोला व सातारा येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम केले असून त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामातून कामाचा ठसा उमटविला आहे. ‘ विकासाचे दिपस्तंभ ’ आणि ‘ मुलूख माझा ’ हे दोन पुस्तकं प्रकाशित आहेत. दैनिक सकाळमध्ये ‘ इतिहासाचे कवडसे ’, दै.लोकमतमध्ये ‘मौलाचा दगड’, दैनिक कृषीवलमध्ये ‘ झिंगेतून-विंगेकडे ’ या सदरातून लेखन केले आहे.सातारा आकाशवाणीवरुन 30 भागांची इथे नांदतो निसर्ग ही पर्यटन मालिका चालवली आहे.

युवराज पाटील हे लातूर जिल्हयातील अहमदपूर तालुक्यातील मौजे चोबळी या गावचे रहीवाशी असून त्यांनी स्वजिल्हयात काहीं वेगळे काम करुन दाखविण्याचा मनोदय व्यक्त केलं. जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी खेळी-मेळीच्या वातावरणात टिम वर्कने काम करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी या कार्यालयातील वरिष्ठ लिपीक विवेक डावरे, विशाखा शेंगडे,लिपीक दिलीप वाठोरे,सर्व साधारण सहाय्यक अहेमद बेग,सिनेयंत्रचालक आश्रुबा सोनवणे, वाहनचालक सिध्देश्वर कोंपले,प्रविण बिदरकर, संदेशवाहक अशोक बोर्डे, व्यंकट बनसोडे उपस्थित होते.                                              
  
****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु