जिल्हयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीमधील 1 हजार 794 प्रकरणे तडजोडीने निकाली

 

जिल्हयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीमधील

1 हजार 794 प्रकरणे तडजोडीने निकाली

  

 लातूर दि.28-(जि.मा.का.) जिल्हयात दिनांक 25 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित रार्ष्टीय लोकअदालतमध्ये 1 हजार 794 प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्रीमती एस.डी.अवसेंकर यांनी दिली आहे. या लोकअदालतीला पक्षकारांचा चांगला प्रतिसादर मिळाला असून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या  आदेशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर व जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथे प्रलंबित व वादपुर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन न्या.मंगला ज.धोटे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात, कौटुंबिक, भुसंपादन व तडजोड युक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आलेली होती.तसेच वादपुर्व प्रकरणामध्ये सर्व एस.बी.आय.बँक, भारत संचार निगम लिमिटेड, टी.व्ही.एस. क्रेडिट सर्व्हिस कंपनी, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं, बँक ऑफ इंडिया, महारार्ष्ट ग्रामीण बँक,बँक ऑफ बडोदा, युको बँक, आय.सी.आय.सी.आय. बँक,यु.बी.आय,एम.जी. बँक, बँक ऑफ बडोदा,बँक,बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँक,आय.डी.बी.आय.बँक,कॅनरा बँक,दिनदयाल नागरी पतसंस्था, महिंद्रा फायनान्स कं, महिंद्रा ट्रान्सपोर्ट फायनान्स कं, व ई –चलन रहदारी वादपुर्व प्रकरणे यांची वादपुर्व प्रकरणे सर्व शाखा मध्यस्थी केंद्रामधील वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली.

लोकअदालतीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे न्या.मंगला ज.धोटे,सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे श्रीमती एस.डी.अवसेकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,पोलीस अधिक्षक निखील पिंगळे,सर्व न्यायाधीश तसेच सदस्य बार कॉन्सील महाराष्ट्र आणि गोवा आण्णाराव पाटील,व लातूर विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष आर.डी.काळे उपस्थित होते.

लोकअदालतीसाठी जिल्हयातुन एकूण (39) पॅनलव्दारे कामकाज पार पाडण्यात आले.यात लातूर तालुक्यातील पॅनलवर न्या.डी.पी.रागीट, न्या.जे.एम.दळवी असे जिल्हा न्यायाधीश, न्या.एस.एन.भोसले, न्या.व्ही.बी. गुळवे पाटील, न्या. ए.ए.शेख, न्या. ए. एस. मुंडे, न्या. ए. एस. आलेवार असे दिवाणी न्यायाधीश व स्तर, न्या. श्रीमती ए. ए. पुंड, न्या. पी. डी. कोळेकर, न्या. व्ही. एस. शिंदे, न्या. श्रीमती ए. एम. शिंदे, न्या. श्रीमती एस. सी. निर्मले, न्या. श्रीमती  यु. ए. भोसले असे दिवाणी न्यायाधीश,क स्तर यांनी पॅनल प्रमुख म्हणुन कामकाज पाहिले.

तसेच या लोकअदालतमध्ये पॅनलवर ॲड व्ही.व्ही.सलगरे,अॅड. किरण पाटील,ॲड.शहाबुद्दीन शेख, ॲड. अभिजीत मगर, ॲड. रुबिना पटेल, ॲड. सी. डी. सुर्यवंशी, ॲड. एस. जी. केंद्रे, ॲड. एस. जी. क्षीरसागर, ॲड.ॲड. शिल्पा शहादपुरी, ॲड. डी. पी. नागरगोजे, ॲड. वैशाली विरकर, ॲड. अंजली जोशी, ॲड. आर. के. चव्हाण, ॲड. गायत्री  नल्ले, ॲड. बिना कांबळे, ॲड.ज्योती  यावलकर,ॲड. योगेश शिंदे,ॲड. स्वाती केंद्रे, अूड.पी.पी.नावंदर,ॲड. सतिश भालेराव यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले.

लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी श्रीमती एस.डी.अवसेकर सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर सर्व न्यायाधीश,ॲड.आण्णाराव पाटील सदस्य बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, ॲड.एस.व्ही.देशपांडे,जिल्हा सरकारी वकिल, जिल्हा वकिल मंडळाचे अध्यक्ष ॲड.आर.डी.काळे,न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

                                               **

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा