नेहरु युवा केंद्रा मार्फत फिट इंडिया फ्रिडम दौडचे आयोजन
नेहरु युवा केंद्रा मार्फत फिट इंडिया
फ्रिडम दौडचे आयोजन
लातूर,दि.23 (जिमाका):- युवा कार्यक्रम
व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कार्यरत नेहरु युवा केंद्र लातूर यांच्या वतीने
“आझादी का अमृत
महोत्सव” निमित्त फिट
इंडिया फ्रिडम दौड आयोजन दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता हुतात्मा स्मृति
स्तंभ, टाऊन हॉल, लातूर मैदान येथून करण्यात येत आहे.
या दौडचे उद्घाटन
खासदार सुधाकर शृंगारे यांच्या शुभहस्ते होणार असुन प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी.पी., जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिंगळे,महापालिका आयुक्त अमन मित्तल,महात्मा
बसवेश्वर महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, दयानंद कला महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ.शिवाजीराव गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे.
फ्रिडम दौडची
सुरुवात हुतात्मा स्मृति स्तंभ टाऊन हॉल येथून करण्यात येवून मुख्य रस्त्याने शिवाजी
चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे समारोप होणार आहे.या कार्यक्रमामध्ये मान्यवराचे
मार्गदर्शन होणार असुन या दौड मध्ये नेहरु युवा केंद्रातील स्वयंसेवक,राष्ट्रीय सेवा
योजनेतील स्वयंसेवक व विविध क्रीडा संघटनेतील युवा कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.या
दौडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी कु.साक्षी
समैया,जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीचे सदस्य डॉ.संजय मवई,जिल्हा क्रीडा अधिकारी
महादेव कसगावडे,सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश हालींगे यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment