जिल्हयात पुरात अडकलेल्या 87 नागरिकांची सुखरुप सुटका § पोहरेगाव येथील तीन व्यक्तींची हेलिकॉप्टरद्वारे सुटका § अडकलेले 46 तर 7 कुटूंबिंयाचे स्थलांतर § वाहून गेलेल्या दोघांचा शोध कार्य सुरु

 

जिल्हयात पुरात अडकलेल्या 87 नागरिकांची सुखरुप सुटका

 

§  पोहरेगाव येथील तीन व्यक्तींची हेलिकॉप्टरद्वारे सुटका

§  अडकलेले 46 तर 7 कुटूंबिंयाचे स्थलांतर

§  वाहून गेलेल्या दोघांचा शोध कार्य सुरु

 

        लातूर,दि.29(जि.मा.का):- जिल्हयात दिनांक 27 व 28 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टी व पाटबंधारे विभागाकडून मांजरा व निम्न तेरणा प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या विसर्गातील पाण्यामुळे पूर परिस्थितीबाबत प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाने  कळविली आहे.

          जिल्हा आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरण लातूर यांच्याकडून पूरात अडकलेल्या व्यक्तींची सुटका / बचाव करण्यासाठी स्थानिक पातळीवर पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या पथकात रबर बोट ओबीएम मशीनसह इतर पूरासंबंधी आवश्यक साहित्य सामुग्रीसह अडकलेल्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. दि.28 व 29 सप्टेंबर, 2021 रोजी सुटका केलेले गावाचे नाव, पथक प्रमुख / संपर्क क्रमांक, सुखरुप सुटका केलेले/स्थलांतर केलेले व्यक्तींची माहिती पूढीलप्रमाणे आहे.

                       सारसा ता. लातूर येथील श्री. कासले संपर्क क्र. 9975719929 व्यक्ती-52, घनसरगाव ता. रेणापूर श्री. राठोड- मो. क्र. 8459482287  व्यक्ती- 2, डिगोळ देशमुख ता. रेणापूर- श्री. शिंदे- मो.क्र.9975143101 / 9011032433-4 व्यक्ती -4 पशुधन-12 ते 15 , हंचनाळ ता. निलंगा येथे तहसीलदार निलंगा - 3 कुटुंबातील 12 व्यक्तींना तर बसपूर ता. निलंगा येथील तहसीलदार निलंगा- 3 कुटुंबातील 12 व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. पोहरेगाव ता. रेणापूर येथील हेलिकॉप्टरव्दारे 3 व्यक्तींची सुखरुप सुटका, टाकळी बु. ता. लातूर येथील श्री. शिंदे - मो.क्र.9975143101 / 9011032433  एकूण 25 व्यक्तींची सुखरुप सुटका मसलगा ता. निलंगा येथील तहसीलदार निलंगा- १ व्यक्तींची सुटका केली.

        पूरात अडकलेल्या व्यक्तींची माहिती पूढील प्रमाणे आहे. आरजखेडा ता. रेणापूर एनडीआरएफ टिम- अडकेलेल्या 40 व्यक्ती, शिवणी ता.औसा  येथील तहसीलदार औसा 6 व्यक्ती.

          पूरात वाहून गेलेल्या व्यक्तींचा तपशील पूढील प्रमाणे आहे. मौजे टिपराळ ता. शिरुर अनंतपाळ येथील श्री. सुनिल राम शेवाळे,  रा.चवन हिप्परगाव ता.देवणी येथील वय वर्ष -27 , मौजे विळेगाव ता. अहमदपूर येथील श्री. गंगाराम सोपान तरुडे वय वर्ष - 37 स्थानिक प्रशासनाकडून शोध कार्य सुरु आहे.

0000

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु