आझादी का अमृत महोत्सव एक्सपोर्टर्स कॉन्क्लेव्ह कार्यशाळा उद्योजकांनी उत्पादीत उत्पादक निर्यात करण्यावर भर द्यावा -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

आझादी का अमृत महोत्सव एक्सपोर्टर्स कॉन्क्लेव्ह कार्यशाळा

उद्योजकांनी उत्पादीत उत्पादक निर्यात करण्यावर भर द्यावा

                                       -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

लातूर,दि.24(जिमाका):-एक्सपोर्टर्स कॉन्क्लेव्ह हा कार्यक्रम जिल्हयातील उद्योजकांच्या अडीअडचणी, प्रश्न सोडविण्यासाठीचा  एक छोटासा प्रयत्न आहे. उद्योजकांनी उत्पादित केलेले उत्पादन निर्यात करण्यावर भर दयावा. उत्पादन निर्यात विषयक दरमहा बैठक घेऊन उद्योजकांच्या ज्या काही समस्या असतील त्या जिल्हा प्रशासनामार्फत लघु मध्यम उद्योग तथा विकास आयुक्त (उद्योग) यांच्याकडून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करेन असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी एक्सपोर्टर्स कॉन्क्लेव्ह निर्यातदारांची कार्यशाळा या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.


भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या देशव्यापी उत्सवाचा भाग म्हणून आझादी का अमृत महोत्सव वाणिज्य उत्सव परराष्ट्र व्यापार महासंचालक व उद्योगसंचालनालय मुंबई आणि जिल्हा उद्योग केंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीडीसी हॉल येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. हे बोलत होते. व्यावसायकांकडून विविध उत्पादनाचे स्टॉल उभारण्यात आले होते, त्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.


या कार्यक्रमाची सुरुवात उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी.हणबर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, फलोत्पादन विकास अधिकारी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ लातूरचे गणेश पाटील, दालमिल उद्योजक नितीन कलंत्री, द्राक्ष व केळी निर्यातदार शेतकरी तुकाराम येलाले, मुंबईचे तज्ञ- राज्य कृषीमाल निर्यात केंद्र डॉ.गोविंद हांडे, पुणे येथील केंद्र व राज्य शासनाच्या निर्यात विषयक योजना व कार्यपध्दती सादरीकरण निर्यात विषयक तज्ञ अविनाश पवार आदिंची व्यासपीठावर उपस्थिती होती.


या निर्यातदारांच्या कार्यशाळेत येथील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने  यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जोड व्यवसायाची आजच्या काळात आवश्यकता आहे.  निर्यात करण्यासाठी प्रक्रिया व संधी काय असणार आहे, याबाबतची माहिती शेतकऱ्यांसाठी तसेच अन्य योजनांची उद्योजकांना यावेळी माहिती दिली. उद्योजकांकडे निर्यातक्षम उत्पादन आहे या उत्पादनाला योग्य भाव मिळावा म्हणून शासन सर्वोत्परीने प्रयत्न करीत आहे. आपल्या जिल्हयात 4 लाख हेक्टरपर्यंत सोयाबीनचे उत्पादन होत असते. सोयाबीन उत्पादनात राज्यात पहिला व देशात दुसरा क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे. जिल्हयात या प्रमुख पिकाबरोबरच फळे, भाज्या यांचीही लागवड मोठया प्रमाणात वाढत आहे. या जिल्हयात उत्पादीत उत्पादन निर्यात करता येईल का यावर भर देणे आवश्यक आहे, असे ही श्री.गावसाने म्हणाले.


या कार्यशाळेत पुणे येथील केंद्र व राज्य शासनाच्या निर्यात विषयक योजना व कार्यपध्दती सादरीकरणाव्दारे सर्व शेतकरी व उद्योजकांना निर्यात विषयक उपयुक्त असे मार्गदर्शन केले.  तसेच निर्यातदारांच्या अडीअडचणीबाबत चर्चा व शंकांचे निरसन करण्यात आले. लातूर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे फलोत्पादन विकास अधिकारी गणेश पाटील यांनीही त्यांच्या विभागाच्या शेतकरी, उद्योजकांसाठी राबवित असलेल्या शासकीय योजनांची माहिती सादरीकरणाव्दारे दिली.

दालमिलचे उद्योजक नितीन कलंत्री यांनी तूर, हरभरा, मुग या दाळीमध्ये आवक मोठी असल्याने लातूर जिल्हा अग्रेसर होता. एमआयडीसीने राबवित असलेल्या शासकीय योजनांची माहितीची जनजागृती तसेच प्रसिध्दीचीही मोठया प्रमाणावर आवश्यकता असल्याचे त्यांनी मत मांडले.

 या  कार्यशाळेचे सुत्रसंचालन राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्रा.वियज गवळी यांनी तर आभार जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी.हणबर यांनी मानले.

                                                      ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु