लातूर येथे ५३ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. "आझादीचा अमृत महोत्सव" साजरा

 

लातूर येथे ५३ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी.

"आझादीचा अमृत महोत्सव" साजरा   


लातूर,दि.27(जिमाका)
:- लातूर येथे ५३ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. च्या वतीने "आझादीचा अमृत होत्सव" साजरा करण्यात आला. यावेळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रैलीमध्ये लातूरच्या यशवंत विद्यालय, राजश्री शाहू महाविद्यालय, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, दयानंद महाविद्यालयाचे एन.सी.सी. मुलां व मुलींनी आणि एन.सी.सी बटालियनच्या सर्व प्रशिक्षक सैनिक, कर्मचारी, सिव्हील स्टाफ यांनी सहभाग घेतला.


५३ महाराष्ट्र बटालियनचे कमांड अधिकारी कर्नल सुनील अब्राहम यांच्या मर्गदर्शनाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन कार्यवाहक कमाडिंग ऑफिसर लेफ्टन कर्नल संतोष कुमार यांनी केले.  या रॅलीचा मुख्य उद्देश एन.सी.सी कैडेट व समाजात देश भक्तिची भावना निर्माण करुसमाजामध्ये एकता व ऐतिहासिक भारताच्या समृद्दीचे, संस्कृतीचे आणि राष्ट्रीय चेतना आठवनीना उजाळा हा होता. रॅलीची सुरुवात लातूर येथील गांधी चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज  चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुलपर्यंत संपन्न झाली.

या रॅलीच्या यशस्वीतेसाठी सुभेदार मेजर दीपक कुमार सुभेदार, सत्यवान जाधव, सुभेदार संतोष भोसले, सुभेदार करण सिंह, सुभेदार पांडुरंग बोरे, सुभेदार दिलीप दामोर, सहायक एन.सी.सी ऑफिसर मेजर डॉ. वाय.. डोके, कैप्टन डॉ. ओमप्रकाश शहापुरकर, कैप्टन डॉ. बालासाहेब गोडबोले, कैप्टन श्री. चौधरी, लेफ्टन अर्चना टाक, चीफ ऑफिसर महावीर काले, लेफ्टन झाम्पले, केरटेकर ऑफिसर काम्बले एन.सी.सी ऑफिसर सचिन गिरवलकर, नमनगे जगदीश, संतोष चव्हान, देवकर राजू, माडवकर अनिल यांनी परिश्रम घेतले आणि राष्ट्र गीताने या रॅलीची सांगता झाली.    

0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु