*अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी* *प्रमाणपत्रे काढण्यासाठी विशेष मोहिम*
*अनुसुचित जमातीच्या
लाभार्थ्यांसाठी*
*प्रमाणपत्रे काढण्यासाठी
विशेष मोहिम*
लातूर,दि.29(जि.मा.का):- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद
कार्यालयातंर्गत औरंगाबाद, जालना, लातूर, बीड या चार जिल्ह्यांचा समावेश असुन अनुसूचित
जमातीच्या (आदिवासी) लाभार्थ्यांसाठी न्युक्लीअस बजेट योजनेतंर्गत जात प्रमाणपत्र काढणे,
आधारकार्ड काढणे, शिधा पत्रिका काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या कार्यालयाच्या अधिनिस्त असलेल्या शासकीय
आश्रम शाळा, अनुदानीत आश्रम शाळा व शासकीय वसतीगृहातील कर्मचारी यांच्यामार्फत संभाव्य
लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करणे, कागदपत्रे उपलब्ध् करुन घेणे ई. कामे शासकीय यंत्रणेमार्फत
सुरु आहेत. ही सर्व कामे शासकीय यंत्रणा शासनाच्या / प्रकल्प कार्यालयाच्या अधिनिस्त
असल्याने यासाठी सर्वेक्षणाच्या वेळी अथवा कागदपत्रे जमा करताना लाभार्थ्यांकडुन कोणत्याही
प्रकारचे शुल्क आकारले किंवा घेतले जात नाही. सर्व कागदपत्रे मोफत काढुन देण्यात येणार
आहेत.
ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व अनुसूचित
जमातीच्या बांधवांनी हे काम शासकीय यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असल्याने कोणत्याही
खाजगी व्यक्तीस, संस्थेस, संघटनेस कुठल्याही कामासाठी पैसे देऊ नये. तथापी, कोणत्याही
अमिषास बळी पडू नये. यासाठी सर्वांनी सहकार्य करुन मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार्य
करावे, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद यांनी प्रसिध्दी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
****
Comments
Post a Comment