रस्ता सुरक्षा अनुषंगाने उत्तम काम करणाऱ्या संस्था / नागरिकांनी नामनिर्देशन पत्रे सादर करावे

 

रस्ता सुरक्षा अनुषंगाने उत्तम काम करणाऱ्या

संस्था / नागरिकांनी नामनिर्देशन पत्रे सादर करावे

 

लातूर,दि.24(जिमाका):- रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींना तात्काळ मदत मिळावी याकरिता काही सेवाभावी संस्था तसेच व्यक्ती (Good Samaritans) सतत कार्यरत असतात, रस्ते अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी अशा सेवा वृत्ती असणाऱ्या व्यक्तिंना यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी ‘Good Samaritans’ यांचे नामांकन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मत्रालय यांच्याकडून मागविण्यात आलेले आहे.

या Good Samaritans चे नामनिर्देशन जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या सुस्पष्ट शिफारशीसह दि. 30 सप्टेंबर 2021 रोजी पर्यंत परिवहन आयुक्त कार्यालयास सादर करावयाचे आहे.

त्या अनुषंगाने सर्व नागरीकांनी रस्ता सुरक्षा अनुषंगाने चांगले काम करणाऱ्या व निकष पुर्ण करणाऱ्या (Good Samaritans) चे नामनिर्देशन या कार्यालयास दि.28 सप्टेंबर 2021 पर्यंत विहीत नमुन्यात सादर करावे असे प्रादेशिक परिवहन अधिकारी लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                       ****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा