मसलगा मध्यम प्रकल्प तलावापासून 500 मिटर अंतरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

 

मसलगा मध्यम प्रकल्प तलावापासून 500 मिटर

अंतरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

 

        लातूर दि.29 (जि.मा.का) मसलगा मध्यम प्रकल्प 89.23 टक्के भरले असून धरणाच्या सर्व 06 दरवाज्याव्दारे पाण्याचा विसर्ग नदीत करण्यात येत आहे. या ठिकाणी भरलेले धरण व पाण्याचा विसर्ग पाहण्याकरीता नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणस्थळी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त उपलब्ध्‍ करुन देणे व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात यावे अशी कार्यकारी अभियंता लातूर पाटबंधारे विभाग क्र.1 यांनी विनंती केली आहे.

         जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन मौजे मसलगा ता. निलंगा मध्यम प्रकल्प येथील साठवण तलावापासून 500 मीटर पर्यंतच्या अंतरात प्रतिबंधात्मक आदेश तात्काळ प्रभावाने जारी केले आहेत. तथापी हे आदेश सदर ठिकाणी शासकीय कामासाठी लागणारे अधिकारी / कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत.

 

                                                    ****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु