लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नला नवी झळाली केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेतील विदयार्थ्यांचे ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून अभिनंदन

 

लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नला नवी झळाली

केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेतील विदयार्थ्यांचे ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून अभिनंदन

* लातुरात सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उभारून विदयार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी प्रोत्साहन देणार

लातूर,दि.25(जिमाका)शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या लातूर जिल्हयातील विदयार्थ्यांनी  केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेत दैदिप्यमान यश मिळविले असून त्यामुळे येथील अनुकरणीय शैक्षणिक पॅटर्नला आणखीन झळाली मिळाली आहे. या सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन करून नव्या पिढीने त्यांचे अनुकरण करीत स्पर्धा परिक्षामधून अधिकाधिक यश मिळवावे असे आवाहन लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

  सन २०२० मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे. या परिक्षेत यशस्वी होणाऱ्या महाराष्ट्रातील विदयार्थ्यांची संख्या लक्षनीय ठाली आहे. लातूर जिल्हयातील विनायक प्रकाशराव महामुनी (९५ वा.), कमलकिशोर देशभूषण कंडारकर (१३७ वा.), नितिशा संजय जगताप (१९५ वी.), शुभम वैजनाथ स्वामी (५३३ वा.), पूजा अशोक कदम (५७७ वा.) आणि निलेश श्रीकांत गायकवाड   (६२९वा.) यांनी स्पृहनिय यश मिळविले आहे. या शिवाय लातूर जिल्हयात वास्तव्य असलेल्या राज्यातील इतर काही विदयार्थ्यांनीही या परिक्षेत यश मिळविले आहे. या सर्व विदयार्थ्यानी मिळविलेले यश लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नला झळाळी देणारे आहे. या सर्वांनी घेतलेली मेहनत, जिद्द व चिकाटी युवा पिढीसाठी अनुकरणीय आहे. त्यांचे यश अभिमानास्पद आणि लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नचा लौकिक वाढवणारे आहे. शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या लातूरसाठी हे उज्वल यश भूषणावह आहे असे सांगून राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सर्वांचे अभिनंदन व त्यांच्या पालकांचे मनस्वी अभिनंदन करून  त्यांच्या आगामी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

  लातूर जिल्हयातील शिक्षण संस्थाचालक, शिक्षक, पालक आणि विदयार्थी यांच्या अथक आणि सातत्यपूर्ण परिश्रमातून लातूर जिल्हयात राज्याला आणि देशाला अनुकरणीय ठरावा असा पॅटर्न तयार झाला आहे. येथील नेतृत्वानेही शैक्षणिक सुविधा उभारून शिक्षणप्रमींना प्रोत्साहन दिल्यामुळे आज लातूर जिल्हा शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आला आहे. दरवर्षी हजारो डॉक्टर, इजिनिअर आणि इतर अधिकारी येथे निर्माण होत आहेत. स्पर्धा परीक्षेची केंद्रही येथे उभारली गेल्यामुळे विदयार्थ्यांची येथे सोय होत आहे. यातुन स्पर्धा परिक्षत सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसेदिवस वाढत असून त्यात यशस्वी होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. येथील शैक्षणिक वातावरण लक्षात घेता विदयार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा उभारण्यावर भर दिला जाईल असेही पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.

                                           ***

 







 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा