चांगले काम करणाऱ्याच्या पाठीवर पुरस्काराची थाप मारल्यानंतर जीवनाला नवी दिशा देणारे असतात - राज्यमंत्री संजय बनसोडे

 

चांगले काम करणाऱ्याच्या पाठीवर पुरस्काराची थाप मारल्यानंतर

 जीवनाला नवी दिशा देणारे असतात

                            - राज्यमंत्री संजय बनसोडे

 

      
लातूर,दि.19(जिमाका):-
चांगले काम करणाऱ्याच्या पाठीवर पुरस्कारची थाप मारल्यानंतर जीवनाला  नवी दिशा देणारे असतात, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. शिवदर्शन फांऊडेशन, लातूरच्यावतीने शिवरत्न पुरस्कार  वितरण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रम अध्यक्ष हभप प्रशांत महाराज चव्हाण खानापुरकर  उद्घाटन माजी आमदार  ॲड. त्र्यंबक नाना भिसे, महापौर विक्रांत गोजमगुडे,  जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील,  जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे , सामाजिक कार्यकर्ता  प्रशांत पाटील,  लातूर मिशन वृत्तपत्राचे संपादक तथा  शिवदर्शन फांऊडेशनचे अध्यक्ष भारत जाधव हे मंचावर  उपस्थित होते. 

            प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भुमिका घेतली त्यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. अशा अष्टपैलू नेत्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा शिवरत्न पुरस्कार दिला जातो. हा आगळा - वेगळा सोहळा आहे याचे नियोजन उत्तम केल्यामुळे सर्व संयोजकांचे पण अभिनंदन केले. विविध विषयांची राज्यमंत्री  संजय बनसोडे यांनी माहिती सांगितली.

          समाजातल्या 14 रत्नांचा शिवरत्नाने  गौरव केल्याने त्यांची उंची वाढली. हभप प्रशांत महाराज चव्हाण खानापुरकर पुरस्कार दिल्याने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडते.  यामुळे सकारात्मक कार्याला आणखीन चांगले  स्वरूप येते. या पुरस्काराचे पवित्र आपण जपले पाहिजे कारण  विलासराव देशमुख व छत्रपती  शिवाजी  महाराजांच्या नावाचा हा पुरस्कार  आहे. या 14 रत्नांच्या गुणांचा गौरव केल्याने त्यांची उंची नक्कीच वाढली  आहे, असे प्रशांत महाराज चव्हाण खानापुरकर म्हणाले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव ही खूप मोठी बाब आहे. माजी आमदार ॲङ त्र्यंबक नाना भिसे पुरस्कारामुळे  व्यक्तींचे खुप  महत्व वाढते. त्यांच्या कार्याला वेगळा आयाम प्राप्त होतो. पुरस्काराचे महत्व असतेच ते शेवटपर्यंत  अबाधित ठेवले गेले पाहिजे असे मत माजी आमदार  अॅड.  त्र्यंबक नाना भिसे यांनी व्यक्त केले. काळाची पावले ओळखून वृत्तपत्र क्षेत्रात बदल आवश्यक आहे. लातूर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील म्हणाले की, वृत्तपत्र क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर काळानुसार  बदल घडत आहेत  काळानुरूप पत्रकारांनी  पत्रकारीता क्षेत्रात बदल केला पाहिजे. सध्याची पत्रकारिता ही खूप वेगळी आहे, या स्पर्धेत  टिकायचे असेल, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता मोठ्या प्रमाणावर सुरू आहे असे अभ्यास पुर्ण मत मांडुन  लातूर मिशन वृत्तपत्र व शिवदशन फाऊंडेशनचे युवराज पाटील कौतुक यांनी केले. पत्रकारांनी  रोखठोक व निर्भीड लेखणीची वापर करावा.

जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे  म्हणाले की, सध्याच्या काळात  परखड व निर्भीड भुमिका मांडणारे वृत्तपत्र  व पत्रकारांची भुमिका महत्वाची आहे. एखाद्या विषयाला पत्रकारच न्याय देऊ शकतो, त्यामुळे त्या लेखनीला धार असणे गरजेचे आहे.  सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन  जयप्रकाश दगडे यांनी केले. प्रशासनात व समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या गुणांचा हा गुणगौरव सोहळा भारत जाधव  अध्यक्ष शिवदर्शन फाऊंडेशन लातूर दरवर्षी शिवरत्न पुरस्कार देऊन कर्तबगार व्यक्तींचा मान्यवरांच्या हास्ते गौरव केला जातो, ही सन्मानाची परंपरा यापुढे अशीच चालू राहील. माझ्या विनंतीला मान देऊन आलेल्या सर्व प्रमख मान्यवर व पुरस्कार प्राप्त वेक्तीचे मनःपूर्वक अभिनंदन  पत्रकार तथा  शिवदर्शन फाऊंडेशनचे अध्यक्ष भारत जाधव  यांनी केले. 

 यावेळी सुत्रसंचालन  बालाजी कांबळे यांनी केले, तर  आभार  प्रा. विनोद चव्हाण यांनी मानले  या कार्यक्रमाला मान्यवर व पुरस्कारार्थीसह परमेश्वर घुटे, सुरेश काचबावार,  तानाजी घुटे,  कैलास साळुंके, श्रीराम गायकवाड, अजित दुटाळ,  दयानंद माने, शंकर जाधव, अजित काळदाते, बालाजी वाघमारे,  गोविंद जगताप, कुमार भालेराव, दिपक बोराडे, तुकाराम जोगदंड, अनिल शेळके, संतोष मगर, लखन सावंत, श्रॄषी मोरे, अजित माने, दिपक शिंदे,  विष्णू शिंदे,  महेश राठोड व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु