एलओसी आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने सायक्लोथॉन -2021 - 50 किलोमीटरचे 3 ऑक्टोबर रोजी आयोजन

 

एलओसी आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने सायक्लोथॉन -2021  

50 किलोमीटरचे 3 ऑक्टोबर रोजी आयोजन

लातूर,दि.20,(जिमाका):- लातूरचे जीवनमान उंचावणाऱ्या व लातूर च्या सौंदर्यात भर पडणाऱ्या लातूर ऑफिसर्स क्लब ने लातूरकरांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या हेतून एलओसी सायक्लोथॉन 2021 या 50 किलो मीटरचे दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 5.30 वाजता आयोजन केले आहे.असे जिल्हाधिकारी तथा लातूर ऑफिसर्स क्लबचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी कळविले आहे.

लातूर ऑफिसर्स क्लब लातूर नागरीकांचे सामाजिक , सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रिडा जीवनमान उंचवीण्यास कटीबध्द आहे. नागरीकांमध्ये व प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे हा लातूर ऑफिसर्स क्लबचा उद्देश आहे.समाजातील गरजू खेळाडू / शासकीय अधिकारी व कर्मचारी / समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरीक / विद्यार्थी यांना विविध क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण घेण्यास मदत होऊस आरोग्यदारी सशक्त समाज निर्माण होणेकरीता मदत होईल.

लातूरकरांच्या आरोग्य व फिटनेस ला प्राथमिकता देण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवावे तसेच मनोरंजन हया हेतून लातूर ऑफिसर्स क्लब ची मुहूर्तमेढ करण्यात आली. अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त हा क्लब लातूरच्या सांस्कृतिक विश्वात एक मानाचा बिंदु ठरेल. लातूर ऑफिसर्स क्लबच्या वतीने लातूर शहरातील सायकलस्वारांना प्रोत्साहन देण्यासाठी 50 किमी. सायक्लोथॉन चे आयोजन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोजक्या सायकलस्वारांना हया सायक्लोथॉन मध्ये भाग घेता येईल.

या सायक्लोथॉनची नोंदणी दिनांक 21 ते 25 सप्टेंबर या दरम्यान लातूर ऑफिसर्स क्लब, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी बार्शी रोड, लातूर या ठिकाणी होईल. सहभागी स्पर्धकांना प्रोफेशनल सायकलींग जर्सी,विशेष मेडल आणि सहभाग प्रमाणपत्र, देण्यात येणार आहे.सायक्लोथॉन चे आयोजन दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 5.30 वाजता होणार आहे. या सायक्लोथॉन चा 50 किमी चा मार्ग हा लातूर ऑफिसर्स क्लब-पीव्हीआर चौक , वाडा हॉटेल, राजीव गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन रेणापूर नाका चौक, महापूर, रेणापूर फाटा, समसापूर पाटी पासून परत नविन रेणापूर नाका, रेल्वे स्टेशन रोड, पीव्हीआर चौक,लातूर ऑफिसर्स क्लब असा असेल.सदर मार्गावर पिण्याचे पाणी, हायड्रेटेशन स्नेंक पॉईंट, प्रथमोपचार, ऐंम्ब्युलन्स,मीड पॉईंट नोंदणी अशा सुविधा आयोजकांतर्फे पुरवण्यात येणार आहेत.

या एलओसी सायक्लोथॉन 2021 अधिकाधिक लातूरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा  ऑसर्स क्लबचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी.यांनी केले. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9699197771, 8446712969 यावर संपर्क साधवा.

                                                      ****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु