राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची टीम लातूरमध्ये दाखल पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली चर्चा
राष्ट्रीय
आपत्ती व्यवस्थापनाची टीम लातूरमध्ये दाखल
पालकमंत्री
अमित देशमुख यांनी केली चर्चा
लातूर दि.28 ( जि.मा.का ):-
लातूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत अडकलेल्या अनेक नागरिकांना जिल्हा प्रशासनाने बाहेर काढले आहे. अजूनही पावसाची शक्यता लक्षात घेऊन पालकमंत्री अमित देशमुख यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन टीम ला पाचरण करण्याची सूचना केली होती. ती टीम आज लातुरात पोहचली आहे.लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख हे वेळोवेळी प्रशासनाला सूचना देत आहेत. त्यानुसार सकाळ पासून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन टीम कार्यरत असून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचविले आहे.
संध्याकाळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची
टीम आली असून पालकमंत्री अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी त्यांच्या बरोबर चर्चा केली.
या टीमला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती, पूरग्रस्त
गावे याची माहिती देण्यात आली असून आता ही टीम प्रशासनाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही
करेल.
0000
Comments
Post a Comment