जिल्हयातील खेळाडूंसाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध् करुन लातूर जिल्हा खेळाचा हब करणार -खासदार सुधाकर श्रृंगारे
जिल्हयातील खेळाडूंसाठी सर्व पायाभूत
सुविधा
उपलब्ध् करुन लातूर जिल्हा खेळाचा
हब करणार
-खासदार सुधाकर श्रृंगारे
लातूर,दि.25
(जिमाका) जिल्हयात नवनवीन खेळाडू निर्माण करण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध्
करुन लातूर जिल्हा हा ‘खेळाचा हब’ जिल्हा करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन
खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी केले.
नेहरु युवा केंद्र लातूर मार्फत हुतात्मा स्मृति स्तंभ टाऊन हॉल येथे
आयोजित आझादी का अमृत महोत्सव निमित्त फिट इंडिया फ्रिडम दौड कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी
ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी स्वातंत्र्य सैनानी तथा जेष्ठ पत्रकार
जीवनधर शहरकर गुरुजी होते. या कार्यक्रमास
स्वातंत्र्य सैनिक बळीराम सोनटक्के, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,पोलीस अधिक्षक निखील
पिंगळे ,प्राचार्य सिद्राम डोंगरगे, नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी कु.
साक्षी समैया, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कासगावडे, युवा पुरस्कार विजेते संगमेश्वर
जनगावे,श्रीमती स्वाती जाधव उपस्थित होते.
यावेळी उद्घाटनपर भाषणात मार्गदर्शन करताना खासदार सुधाकर श्रृंगारे
म्हणाले की, जिल्हयात नवनवीन खेळाडू निर्माण करण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा तसेच ग्रामीण
भागात खेळाडूसाठी प्रशिक्षण उपलब्ध् करुन लातूर जिल्हा हा शिक्षणाबरोबरच खेळाचा हब
जिल्हा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून जिल्हयात क्रिकेट या खेळासाठी स्टेडियम
उभा करणार असल्याचे मानस त्यांनी व्यक्त केले.आपण फिट राहीलो तर आपला देश फिट राहणार
आहे.यासाठी जिल्हयातील सर्व सामान्यांनी प्रत्येक दिवशी एक तास आपल्या फिटनेससाठी दयावा
असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्ष पदावरुन मार्गदर्शन करताना स्वातंत्र्य सेनानी तथा जेष्ठ पत्रकार
जीवनधर शहरकर गुरुजी म्हणाले की, आपला देश सदृढ करण्यासाठी प्रथम ग्रामीण भाग सुधारला
पाहीजे.प्रत्येक व्यक्तीने ग्रामीण भागातील स्वच्छतेकडे लक्ष देऊन काम करण्याचे आवाहन
केले.यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, प्राचार्य
सिद्राम डोंगरगे, श्रीमती स्वाती जाधव यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मृति स्तंभास पुष्पचक्र अर्पण
करण्यात येऊन दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची उद्घाटन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य
सैनिक जीवनधर शहरकर गुरुजी व बळीराम सोनटक्के यांचा खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या
हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
यांनी फिट इंडिया प्रतिज्ञाचे वाचन केले.तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनीनी कवायतीचे
सादरीकरण केले.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास खासदार सुधाकर श्रृंगारे
व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन फिट इंडिया फ्रिडम दौडला हरी झेंडी
दाखवली.सदरील दौड हुतात्मा स्मृति स्तंभ टाऊन
हॉल येथून शिवाजी चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकूल येथे जावून समारोप करण्यात आला.या
फ्रिडम दौड मध्ये विद्यार्थी / विद्यार्थीनीनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन व्यकटेश हालींगे,प्रस्ताविक कु.साक्षी समैया तर आभार डॉ.संजय गवई यांनी
मानले.
***
Comments
Post a Comment