पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तींची बचाव / सुटका करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती

 

पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तींची

बचाव / सुटका करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती 

 

*रेणापूर व लातूर तालुक्यातील पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुखरुप सुटका

 

          लातूर दि.28-(जि.मा.का) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण लातूर यांच्याकडून पुरात अडकेल्या व्यक्तींची सुटका/ बचाव करण्यासाठी स्थानिक पातळीवर 3 पथकांची नेमणूक करण्यात आली असल्यचे जिल्हा प्रशासनने कळविले आहे.

या पथकात रबर बोट ओबीएम मशिनसह इतर पुरांसबंधी आवश्यक साहित्य सामुग्रीसह अडकलेल्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे.

या मध्ये पथक क्रमांक 1 गावाचे नाव सारसा, देवळा, ता. रेणापूर. पथक प्रमुख व संपर्क क्र. श्री. कासले 9975719929, पथक क्र. 2 गावाचे नाव घणसरगाव ता. रेणापूर  पथक प्रमुख व संपर्क श्री राठोड 8459482287, पथक क्र.  3 गावाचे नाव डिगोळ देशमुख ता. रेणापूर पथक प्रमुख व संपर्क श्री शिंदे 9975143101 / 9011032433 यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

मौजे डिगोळ देशमुख ता. रेणापूर जि. लातूर येथील पुरात अडकलेल्या 3 व्यक्तींची सुखरुप सुटका या पथकाकडून करण्यात आली. मौजे घनसावरगाव ता. रेणापूर जि. लातूर येथील पुरात अडकलेल्या 2 व्यक्तींची सुखरुप सुटका या पथकाकडून करण्यात आली. मौजे सारसा ता. जि. लातूर येथील पुरात अडकेल्या एकूण 40 व्यक्तीपैकी दुपारी 3-00 वाजेपर्यंत 25 व्यक्तींची सुखरुप सुटका केली असून उर्वरित अडकलेल्या 15 व्यक्तींची सुटका करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती लक्षात घेवून पुरात अडकलेल्या व्यक्तींचे मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ टीमला पुणे येथून पाचारण करण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून मौजे पोहरेगाव ता. रेणापूर येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तींचे स्थानिक बोटीने मदत व बचाव कार्य शक्य नसल्याने भारतीय वायु सेना पुणे येथून हेलिकॉप्टर (चॉपर) बोलावण्यात आलेले आहे.

जिल्हाधिकारी महोदयांनी व्हिडीओ क्लिप तसेच नागरिकांनी मांजरा व तेरणा नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे / आपत्पकालीन परिस्थितीत तालुका नियंत्रण संपर्क प्रमुखांचे मोबाईल क्रमांक सर्वासाठी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

जिल्हयातील पूरजन्य परिस्थितीत प्रशासनास संपर्क साधावे यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथील नियत्रण कक्षात दूरध्वणी घेणेसाठी कर्मचारी यांची नियुक्ती केलेली आहे.नियंत्रण कक्षाचा दूरध्वणी क्रमांक 02382-223002 असा आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,लातूर अतर्गत विविध यंत्रणामार्फत यामध्ये पोलिस विभाग ,अग्नीशमन विभाग,स्थानिक पातळीवरील यंत्रणेमार्फत पूरात अडकलेल्या व्यक्तींना मदत व बचाव कार्य केले आहे.

 

                                                 ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा