जिल्हयामध्ये दिनांक 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

जिल्हयामध्ये दिनांक 25 सप्टेंबर रोजी

राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

     लातूर,दि.22(जिमाका) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देषानुसार दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी  लातूर जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 या लोकअदालतमध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात, भू-संपादन, 138 एन.आय.अॅक्ट, कौटुंबिक प्रकरणे, बॅंक वसुली प्रकरणे, कामगार, सहकार न्यायालय, वीज व पाणी बिल प्रकरणे, पगार व भत्ते प्रकरणे आणि सेवानिवृत्ती विशयक प्रकरणे, महसूल प्रकरणे व इतर दिवाणी प्रकरणे षिवाय वादपुर्व प्रकरणांमध्ये कलम 138 एन.आय.अॅक्ट प्रकरणे, बॅंक वसुली प्रकरणे,  कामगार वाद प्रकरणे, वीज व पाणी बिल प्रकरणे, दूरध्वनी/मोबाईल कंपण्याची प्रकरणे अषा सर्व प्रकारची तडजोडयोग्य प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.  

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्येही भूसंपादनाची प्रकरणे मोठया प्रमाणात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार असून संबंधित शासकीय भू-संपादन विभागाकडून सकारात्मक  प्रतिसाद मिळणार आहे. त्यामुळे  संबंधित पक्षकारांनी आपल्या वकिलांशी त्वरीत संपर्क करुन त्यांच्या भू-संपादनाची प्रकरणे या लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच अपघात दावा प्रकरणांमध्ये ही संबंधित विमा कंपन्यांची जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटविण्याबाबत प्रयत्न होणार असून त्यामुळे ज्या पक्षकारांची अपघात दावा प्रकरणे प्रलंबित आहेत त्यांनी आपापली प्रकरणे तडजोडीने मिटवून घेण्यासाठी संबंधित वकिलांशी व न्यायालयाशी संपर्क करावा. त्याचप्रमाणे कौटुंबिक, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमाने मिटविण्यासाठी संबधित पक्षकारांनी पुढाकार घ्यावा.

सदरिल लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सर्व पक्षकार, विधिज्ञ व संबंधित अधिका-यांनी सहकार्य करावे असे आवाहन  प्रमुख जिल्हा न्यायाधीष तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्या. मंगला ज. धोटे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,न्या. एस.डी. अवसेकर  जिल्हा सरकारी वकिल, अॅड. संतोश देशपांडे व अध्यक्ष, जिल्हा विधिज्ञ मंडळ अॅड. आर.डी. काळे यांनी केले आहे.

 

0000

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा