तिरु प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीच्या कामास निधी कमी पडू देणार नाही -राज्यमंत्री संजय बनसोडे

 

तिरु प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीच्या कामास निधी कमी पडू देणार नाही

                                                    -राज्यमंत्री संजय बनसोडे

      
लातूर,दि.18(जिमाका):-
उदगीर तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्प धरण शंभर टक्के भरले असून तिरु प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीच्या कामास निधी कमी पडू देणार नाही असे राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी  जलपूजनाच्या  कार्यक्रमा प्रसंगी प्रतिपादन केले.

            या जलपूजन कार्यक्रमासाठी  जिल्हा परिषद सदस्य कल्याणकर,श्री. निटूरे, माधव कांबळे, ज्ञानेश्वर पाटील, सरपंच नाथराव भंडे,  सरपंच अडूळवाडी, वाढवणा (खू.), चिमाची वाडी, हंडरगुळी, उपविभागीय अधिकारी जलसंपदाचे शाखा अभियंता एन.ए.मोमीण, श्री. त्रिपाठी, श्री.पारसेवार, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते श्याम डावळे यांची यावेळी उपस्थिती होती.

तिरु धरणाची तांत्रिक माहिती नसीम मोमीन यांनी दिली. प्रस्तावीत तिरु डावा कालवा/  उजवा कालवा दुरुस्ती विषयी माहिती दिली.

तसेच बंद नलीकेव्दारे व एक हौद वितरण व्यवस्थेनुसार साठ्यामधील शेतकऱ्यांसाठी कसे सिंचन करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तिरु धरणाचे "गोडबोले द्वार " याची पाहणी केली. तसेच हे व्दार अपोआप उघडत नाही हे त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर संबंधित यंत्रणा कंत्राटदार यांची तातडीने बैठक लावण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. तसेच हे व्दार तात्काळ दुरुस्ती करण्याच्याही सूचना दिल्या.

तसेच तिरुच्या कालव्याचा  सर्वे तात्काळ पूर्ण करुन अंदाजपत्रक शासनास सादर करावे तसेच तिरु नदीवरील संरक्षक भिंतीचे तात्काळ बांधकाम सुरु करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उदगीर, जळकोट तालुक्यातील विकास कामे मंजूर झालेली व प्रस्तावित कामांसंदर्भात सर्वांना माहिती करुन दिली.

हा प्रकल्प शंभर टक्के भरला असून येत्या रब्बी, उन्हाळी हंगांमासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबतचा अहवान श्री. मोमीन नसीम यांनी केले. या जलपूजन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम डावळे यांनी केले.

                                                       ****











Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा