रुई दिंडेगाव व ढोकी येथे जलसुरक्षा आराखड्यासाठी क्षेत्रीय सर्वेक्षण सुरु
रुई दिंडेगाव व
ढोकी येथे जलसुरक्षा
आराखड्यासाठी क्षेत्रीय
सर्वेक्षण सुरु
लातूर,दि.21,(जिमाका):-लातूर तालुक्यातील
मौजे रुई दिंडेगाव व मौजे ढोकी या गावांमध्ये अटल भूजल योजनेअंतर्गत या गावांत ग्रामपंचायत
व ग्रामस्थ, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, महिला बचत गट, व अंगणवाडी सेविका यांची
नुकतीच संयुक्त बैठक घेवून या गावांचा सहभागी गाव अभ्यास करण्यासाठी (PRA) माध्यमातून रांगोळी नकाशाव्दारे या योजनेअंतर्गत
प्रस्तावित जलसुरक्षा आराखड्यासाठी क्षेत्रिय सर्वेक्षण सुरु करण्यात आले असल्याचे
वरिष्ठ भूवैज्ञानिक एस.बी.गायकवाड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
यावेळी आराखड्यासाठी
आवश्यक असणारी गावस्तरीय माहिती, जल अंदाजपत्रक व महाराष्ट्र भूजल ,विकास व व्यवस्थापन
अधिनियम 2009 चा व या योजनेचे उद्दिष्ट्ये व वैशिष्ट्ये यांची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक
श्री. गायकवाड यांनी दिली.
या बैठकीस मौ.
दिंडेगावच्या सरपंच विजया लाहाडे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रप्रकाश लाहाडे, मौजे ढोकीचे
सरपंच अनिरुध्द पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर बोराडे , संबंधीत गावचे तलाठी ग्रामसेवक,कृषि
सहाय्यक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
ही योजना राबविण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असून यावेळी
शाखा अभियंता एम.बी. सोमवंशी, सर्वेक्षक श्री.पिटले, DPMU कक्षातील भूवैज्ञानिक एम.एच.शेख, ए.सी.पठारे, जलसंधारण तज्ञ श्रीमती रोहीणी रावळे,संवादतज्ञ एच.आर. नाईक,आर.एम.पठाण
उपस्थित होते.
****
Comments
Post a Comment